शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

 उन्हाळ्यात अशी करा कपड्यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 7:20 PM

1 / 6
उन्हाळ्यात घाम जास्त येतो म्हणून कोणत्याही प्रकारचे जाड किंवा सील्कचे  कपडे घालण्यापेक्षा सुटसुटीत कॉटनचे कपडे घालणं सर्वांना आवडतं. म्हणूनच उन्हाळ्यात साध्या दिसणाऱ्या तरीही फॅशनेबल असणाऱ्या कपड्यांची निवड कशी करावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  
2 / 6
१ ) फ्लोरल कुर्ती - सुती कापडावर पूर्णपणे फुलांनी डिझाईन केलेल्या कुर्ती कोणत्याही जीन्सवर शोभून दिसतात. या कुर्तींचं आकर्षण म्हणजे उन्हाळ्यात घालण्यासाठी सोयीस्कर अशा या कुर्ती फॅशनेबलही वाटतात.  
3 / 6
२) कॉटन टॅाप्स - हे टॅाप्स तुम्ही कोणत्याही जीन्स किंवा स्कर्टवर घालू शकता. उन्हाळ्यात कॅाटन टॅाप्स विकत घेण्याकडे कॉलेजमधील मुलींचा जास्त कल असतो. कॅाटन टॉप्समुळे उष्णता जास्त जाणवत नाही
4 / 6
३) मॅक्सी ड्रेस - उन्हाळ्यामध्ये पांढरा, पिवळा, केशरी किंवा कोणताही फिकट रंगाचा मॅक्सी ड्रेस तुम्ही घालू शकता. जेणेकरून तुमचा लूक चांगला दिसेल व तुम्हालाही सुटसुटीत वाटेल.
5 / 6
४) पोल्का डॅाट - पोल्का डॅाटच्या शर्ट्स किंवा टॅाप्सची फॅशन कधीही जुनी होत नाही. उन्हाळा असो किंवा हिवाळा महिलांची कायमच पहिली पसंती पोल्का डॅाट्सला असते. 
6 / 6
५) कॉटन ड्रेस - दररोज जीन्स आणि टॅाप घालून जर कंटाळा आला असेल तर उन्हाळ्यात कॉटनचे ड्रेस घालणं हा तुमच्याकडे सोप्पा पर्याय आहे. फिकट रंगांमध्ये कॅाटनचे ड्रेस घालणं हा पर्याय उन्हाळ्यात नेहमीच उत्तम ठरतो.
टॅग्स :fashionफॅशनMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र