नवा रेकॉर्ड! IAS मुलाखतीत 'तिच्या' साडीवर विचारला प्रश्न; बेधडक उत्तरानं जिंकली सर्वांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:30 AM2021-09-30T11:30:08+5:302021-09-30T11:37:40+5:30

तुम्ही UPSC आयएएस परीक्षेच्या अंतिम मुलाखतीमधील प्रश्नांबद्दल ऐकलं असेल. या प्रश्नांना इंटेलिजेंट उत्तर देऊनच उमेदवाराला यश मिळतं. या परीक्षेत नवव्या क्रमांकावर झेप घेणाऱ्या डॉ. अपाला मिश्रा यांनाही असेच काहीसे प्रश्न विचारण्यात आले. ज्याची उत्तरं देऊन त्यांना यश मिळालं. यात एक प्रश्न त्यांच्या साडीच्या पदराबाबत विचारण्यात आला होता. यात त्यांनी जे उत्तर दिले ते सर्वांना आश्चर्य करणारं होतं.

अपाला मिश्रा यांनी परीक्षेत सिद्ध केले की, आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही कुठलीही स्पर्धा सहज जिंकू शकता. UPSC परीक्षा रँक लिस्ट मंगळवारी रात्री उशीरा जारी करण्यात आली. डॉ. अपाला यांनी मुलाखतीत आतापर्यंत सर्वात जास्त मार्क्स मिळवलेले आहेत. त्यांना २१५ गुण मिळाले हा एक नवा रेकॉर्ड आहे. आतापर्यंत मुलाखतीच्या राऊंडमध्ये इतके गुण कुणीही मिळवले नाहीत असा दावा डॉ. अपाला मिश्रा यांनी केला आहे.

डॉ. अपाला म्हणाल्या की, ४० मिनिटांच्या मुलाखतीच्या फेरीत जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी दिली. मुलाखतीच्या फेरीला सुरुवात होताना थोडी भीती होती परंतु आत्मविश्वासदेखील होता. मुलाखतीची फेरी सर्वात महत्त्वाची असते त्यात तुमचं प्रेजेंटेशन आणि पर्सनैलिटी पाहिली जाते.

या मुलाखतीच्या फेरीत उमेदवाराच्या प्रत्येक छोट्या मोठ्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जाते. त्यावरून मुलाखतीत गुण दिले जातात. त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता न करता स्वत:ला तयार ठेवा. आत्मविश्वास बाळगा तुम्ही हे करू शकता हे मनात ठरवा.

प्रश्न १ – तुमच्या नावाचा अर्थ काय आहे? असं नाव का ठेवलं? उत्तर – अपाला नाव ऋगवेदी युगातील महिला ऋषीचं होतं. हे नाव माझ्या आईनं ठेवलं कारण ती हिंदी प्रोफेसर आहे. त्यामुळे साहित्याची तिला आवड आहे. अपाला शब्दाचा अर्थ पाहिला तर सुंदर असा आहे. प्रश्न २ – आर्मीत कशाप्रकारचं चॅलेंज असतं त्याचसोबत त्याची सकारात्मक बाजू काय आहे? उत्तर – संरक्षण खात्यात अनेक चॅलेंज आहेत परंतु वेळेनुसार आता चॅलेंज बदलत आहेत. यातील सर्वात मोठा चॅलेंज महिलांसाठी होतं कारण आता महिलांनाही त्यात संधी मिळाली आहे. संरक्षण क्षेत्रात भारत पुढे जात आहे. त्यासोबत या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत धर्तीवर काम सुरू आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त हत्यारं आणि अन्य उपकरणं भारत स्वत:चं बनवत आहे.

प्रश्न ३ – भारतात विविध भाषा आहेत त्याकडे कसं पाहता? उत्तर – भारतात विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. ती आपल्या भारताची विशेषता आहे. विविधतेमध्ये एकता ही भारताचं दर्शन त्यातून घडतं. प्रश्न ४ – तुम्ही जी साडी घातलीय त्यावरील पदरावर जी बोर्डर आहे ते काय दर्शवतं? उत्तर – या साडीच्या पदरावर वारली चित्रकला आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पट्ट्यात ही वारली चित्रकला प्रसिद्ध आहे. पदरावर केलेलं आर्ट वर्क हे सर्वसामान्याचं जीवन दाखवतं.

प्रश्न ५ – कसंही करून कुठलीही एक कविता ऐकून दाखवा? उत्तर – ही कविता मी माझ्या भावासाठी लिहिली होती कारण माझा भाऊ मेजर आहे. त्याच्यासाठी मी कविता समर्पित केली होती. When I think of u, I think of my country too when I salute you I salute my country too प्रश्न ६ – स्ट्रगलला कसं पाहता? उत्तर – स्ट्रगलला कधीही स्ट्रगल अथवा कठीण काळ म्हणून पाहायला नको तर स्ट्रगल करून जे काही मिळवलं ते ध्यानात ठेऊन पुढे प्रवास करायला हवा.

UPSC परीक्षेत डॉ. अपाला मिश्राने देशभरात ९ व्या क्रमांक पटकावला. तिसऱ्या प्रयत्नात अपाला यशस्वी झाली आहे. पहिल्या दोन प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतरही अपाला यांनी हिंमत हरली नाही. ऑक्टोबर २०२० मध्ये तिसऱ्यांदा अपालाने परीक्षा दिली आणि थेट ९ व्या क्रमांकावर येत यश संपादन केले. त्यानंतर अपालाच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

अपाला हिला देशसेवा करण्याची आवड आहे. जीवनात असं काही करायचं आहे ज्याने देशात चांगले आणि मोठा बदल होऊ शकेल. सुरुवातीच्य काळात बीडीएस शिक्षण घेतलं त्यानंतर देशसेवा करण्यासाठी तिने नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. अपालाचे वडील अमिताभ मिश्रा आर्मीत कर्नल आहेत तर मोठा भाऊ मेजर आहे. अपालाची आई हिंदी प्रोफेसर आहे.

१ वर्षापूर्वी अपालाने तिच्या रुममध्ये आय विल बी अंडर ५० नावाचं पोस्टर बनवून चिटकवलं होतं. या पोस्टरकडे ती दिवसरात्र पाहून तिचं टार्गेट पूर्ण केले. दिवसाला ८ ते १० तास ती अभ्यास करत होती. त्याचसोबत दिवसातून ३०-४० मिनिटं टेबल टेनिस खेळत अभ्यासाचा ताणतणाव कमी करायची.