शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shocking! लव्ह मॅरेजच्या १० महिन्यांनंतर पत्नीने दुसऱ्या व्यक्तीसोबत केलं लग्न, व्हिडीओ पाहून पती 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 12:45 PM

1 / 11
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका तरूणाला प्रेमात मोठा दगा मिळाला आहे. पोलिसांकडे पोहोचलेल्या तरूणाने सांगितलं की, लव्ह मॅरेज केल्यावर १० महिन्यानंतर पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. पत्नी तिच्या आईसोबत घरातून दागिने आणि रोख रक्कम देऊन गेली.
2 / 11
आता तिने दुसरं लग्न केलं. याचा खुलासा पत्नीच्या दुसऱ्या लग्नाचा व्हिडीओ पतीने पाहिल्यावर झाला. पीडित तरूण पत्नीचा व्हिडीओ घेऊन पोलिसात पोहोचला. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
3 / 11
कानपूरमध्ये राहणारा अमित शर्माने सांगितलं की, गोविंद नगर कच्ची वस्तीमध्ये राहणाऱ्या रूची वर्मासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. दोघांनी ४ जून २०२० ला आर्यसमाज मंदिरात घराच्यांच्या सहमतनीने लग्न केलं.
4 / 11
कोरोना काळात झालेल्या या लग्नात घरातीलच पाच लोक उपस्थित होते. आर्यसमाज मंदिरात झालेल्या लग्नाचं सर्टिफिकेटही आहे.
5 / 11
अमितने सांगितलं की, लव्ह मॅरेजनंतर दोघेही आनंदाने आरामात जीवन जगत होते. लग्नाच्या चार महिन्यांनंतर २३ सप्टेंबरला पत्नीची आई त्याच्या घरी आली.
6 / 11
तिने सांगितलं की, परिवारातील कुणाचं तरी लग्न आहे. हे कारण सांगत ती रूचीला सोबत घेऊन गेली. रूची सोबत घरातून ५० हजार रूपये आणि दागिनेही सोबत घेऊन गेली.
7 / 11
रूची माहेरी गेल्यावर काही दिवसांनी पतीने पत्नीला फोन केला तर तिचा फोन बंद येत होता. तो तिला घेण्यासाठी तिच्या घरी गेला. तर तिने सोबत येण्यास नकार दिला.
8 / 11
त्याने तिला बरंच समजावलं, पण रूची त्याच्यासोबत परत जाण्यास तयार झाली नाही. त्यानंतर त्याने भानगडीची चौकशी सुरू केली. तेव्हा हैराण करणारं सत्य समोर आलं.
9 / 11
अमितने सांगितलं की, तीन दिवसांपूर्वी त्याला समजलं की, घटस्फोट न घेताच रूचीने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. त्याला आधी यावर विश्वास बसला नाही. पण जेव्हा तो माहिती मिळवण्यासाठी आर्यसमाज मंदिरात पोहोचला तेव्हा त्याला पत्नीच्या दुसऱ्या लग्नाचा व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ पाहून तो हैराण झाला.
10 / 11
पीडितने पोलिसांना सांगितलं की, पत्नीने २ जुलै २०२१ ला दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. त्याने पत्नी आणि तिच्या परिवारावर फसवणुकीचा आरोप करत तक्रार दिली आहे. अमितने सांगितलं की, त्याच्या पत्नीने आतापर्यंत तीन लग्ने केली आहेत.
11 / 11
याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, पतीच्या तक्रारीची चौकशी केली जात आहे. आठ महिन्यांआधीही पती-पत्नीतील वाद पोलिसात स्टेशनमध्ये आला होता. तेव्हा दोघांना समजावून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर महिला तिच्या आईसोबत निघून गेली होती. आता पतीने घटस्फोट न घेताच लग्न करणे आणि घरातून पैसे नेण्याचा आरोप लावला आहे.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न