कोरड्या विहिरीतून रात्रभर येत होता किंचाळण्याचा आवाज; सकाळी वाकून पाहिलं तर गावकरी हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 01:56 PM2021-07-27T13:56:11+5:302021-07-27T14:02:39+5:30

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर दुर्दैवी घटना घडली आहे.

राजस्थानच्या भरतपूर इथं एका विहिरीतून रात्रभर कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येत होता. सकाळी विहिरीच्या शेजारून जाणाऱ्या इसमांनी विहिरीत वाकून पाहिले तर त्यांना मोठा धक्का बसला.

काही लोकांनी विहिरीत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाहिलं. या मुलीसोबत दोन युवकांनी गँगरेप केल्याचं आढळून आलं. त्यानंतर या मुलीची हत्या करण्याच्या हेतून आरोपी युवकांनी तिला विहिरीत फेकलं. सध्या या मुलीला बाहेर काढण्यात आलं आहे.

भरतपूर जिल्ह्यातील एका गावात शौचालयाला गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीला शेजारील गावातील दोघा तरूणांनी अपहरण केले. आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या मुलीला कोरड्या विहिरीत फेकून या तरूणांनी पळ काढला.

विहिरीच्या आत ही पीडित युवती जोरजोरात ओरडत होती. परंतु रात्रीची वेळ असल्यानं विहिरीकडे कुणीही फिरकलं नाही. मात्र दुसऱ्या दिवशी या विहिरीच्या रस्त्याने निघालेल्या काही लोकांनी तिला बाहेर काढलं आणि घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना दिली.

मुलीच्या वडिलांनी आरोप केलाय की, त्यांची मुलगी २४ जुलैला संध्याकाळी जंगलाच्या दिशेने शौचास गेली होती. तेव्हा शेजारील गावातील दोन युवकांनी तिचं अपहरण केले. सामूहिक बलात्कार केल्यानंतर त्यांनी तरूणीला विहिरीत फेकून दिलं.

पोलीस सध्या या आरोपींचा शोध घेत आहेत. माहितीनुसार, पीडित युवती २४ जुलैच्या संध्याकाळी ७ वाजता घरातून शौचालयाला बाहेर जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा रस्त्यात शेजारील गावातील दोन युवकांनी तिला अडवलं.

जेव्हा या मुलीने विरोध केला तेव्हा तिचं तोंड बंद करून अपहरण केले. त्यानंतर दोघा युवकांनी अल्पवयीन युवतीवर बलात्कार केला. या मुलीची हत्या करण्याच्या हेतून दोघांनी तरूणीला कोरड्या विहिरीत फेकून दिले. मात्र सुदैवाने ती मुलगी बचावली.

या दोन्ही आरोपी तरूणांनी जागेवरून पळ काढला. त्यानंतर विहिरीतून रात्रभर ओरडण्याचा आवाज येत होता. परंतु जंगल आणि रात्रीची वेळ असल्याने कुणीच मदतीसाठी आलं नाही. पीडित तरूणी रात्रभर विहिरीतून मदतीसाठी याचना करत राहिली.

रात्रभर पीडित तरूणी जोरजोरात किंचाळत होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीच्या शेजारील रस्त्याने जाणाऱ्या काही गावकऱ्यांनी या तरूणीचा आवाज ऐकला. ते तात्काळ धावत विहिरीजवळ गेले आणि विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर हादरले.

पीडित युवतीला गावकऱ्यांनी विहिरीतून बाहेर काढलं त्यानंतर या मुलीच्या नातेवाईकांना याबाबत कल्पना देण्यात आली. पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Read in English

टॅग्स :पोलिसPolice