दोन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यावर राज कुंद्राची झाली अशी अवस्था, फोटो बघून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 02:31 PM2021-07-22T14:31:25+5:302021-07-22T14:36:36+5:30

Raj Kundra Arrest: पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी बेड्या ठोकलेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आता या प्रकरणात होत असलेल्या चौकशीमधून नवनवे गौप्यस्फोट होत आहेत.

पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी बेड्या ठोकलेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आता या प्रकरणात होत असलेल्या चौकशीमधून नवनवे गौप्यस्फोट होत आहेत.

न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केलेल्या राज कुंद्रा याची आज पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

वैद्यकीय चाचणी केल्यानंतर राज कुंद्रा याची रुग्णालयाबाहेरची छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये राज कुंद्रा याची दोन दिवस पोलीस कोठडीत वास्तव्य केल्यानंतर झालेली अवस्था दिसत आहे.

राज कुंद्रा याला पोलीस आपल्या व्हॅनमध्ये बसवून नेताना दिसत आहेत. त्यावेळी टिपण्यात आलेल्या या छायाचित्रांमध्ये राज कुंद्राचा चेहरा पडलेला दिसत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत आहे.

या खटल्यामध्ये राज कुंद्रासह ११ अजून लोकांना अटक करण्यात आली आहे. आता उद्या राज कुंद्रा याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा हाच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले. तसेच त्याचे फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स सिल करण्यात आले आहेत.

Read in English