Raj Kundra Case : राजला बघताच भडकली होती शिल्पा शेट्टी, म्हणाली - परिवाराची बदनामी केलीस...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:56 PM2021-07-27T12:56:03+5:302021-07-27T13:21:37+5:30

Shilpa Shetty :

पोर्नोग्राफी केसमध्ये अटक झाल्यावर राज कुंद्राच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्याच्या व्हॉट्सअॅप चॅट, फोन आणि साक्षीदारांच्या जबाबावरून राजचे अनेक गुपित उघड झाले आहेत. याच केसप्रकरणी २३ जुलैला राजची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली. क्राइम ब्रॅंचने शिल्पाच्या घरी जाऊन तिला यासंबंधी काही प्रश्न विचारले. यावेळी अधिकारी राज कुंद्रा यालाही सोबत घेऊन गेले होते. यावेळी राजला पाहून शिल्पाचं रिअॅक्शन काय होतं?

शुक्रवारी २३ जुलैला जेव्हा क्राइम ब्रॅंचचे अधिकारी जुहू येथील शिल्पाच्या घरी पोहोचले तेव्हा शिल्पा राजला बघून रागाने ओरडली. ती रागाने राजला म्हणाली की, 'या केसने परिवाराची बदनामी केली आहे. अनेक एंडोर्समेंट, बिझनेस डील्स हातून गेल्या आहेत'.

शिल्पाची सहा तास चौकशी करण्यात आणि तिचा जबाब रेकॉर्ड करण्यात आला. क्राइम ब्रॅंचच्या सीनिअर ऑफिसरने सांगितलं की, 'या केसमध्ये शिल्पा शेट्टीचा काहीच रोल नाही. अजूनपर्यंत तिचा या केसशी काहीच संबंध आढळून आलेला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा काही प्रश्न विचारणार नाही आहोत'.

राजला अटक झाल्यावर शिल्पाला चांगलाच धक्का बसला होता. तिचा राग सगळं काही राजला बघताच बाहेर आला होता. त्या दिवशी राजला बघताच ती ओरडली. खूप रडली आणि राजवर ओऱडली. शिल्पा राजला म्हणाली की, हे सगळं का केलं?

शिल्पा म्हणाली की, परिवाराच्या बदनामीसोबत अनेक बिझनेस डील्स कॅन्सल झाल्या आहेत. यादरम्यान राजही शिल्पासोबत बोलत होता. तो स्वत:ला निर्दोष असल्याचं सांगत होता आणि तो म्हणत होता की, त्याच्यावरील या केसला काहीच आधार नाही. राज म्हणाला की, त्याने पॉर्न नाही तर एरॉटिका मुव्हीज बनवल्या आहेत.

चौकशीआधी शिल्पा राजवर भडकली होती. पण नंतर तिने तिच्या पतीची बाजू घेतली आणि म्हणाली की, राज पॉर्न कंटेंट बनवत नाही. शिल्पा म्हणाली की, HotShots अॅपसोबत तिचं देणंघेणं नाही. सोबतच हेही म्हणाली की, पॉर्न आणि एरॉटिका दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

२९ जुलैला राज कुंद्राला पॉर्न सिनेमे बनवणे आणि ते अपलोड करणे या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची कोठडी २७ जुलैपर्यंत वाढली होती. ही कोठडी आता आणखी १४ दिवसाने वाढली आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासामधून राज कुंद्रा याची कंपनी फ्लिज मुव्हीजच्या उत्पन्नातील काही भाग हा कानपूरमधील रहिवासी असलेल्या अरविंद श्रीवास्तव याची पत्नी हर्षिता हिच्या खात्यामध्ये थेट ट्रान्सफर होत असल्याचे उघड झाले आहे.

तसेच या खात्यांमधील सविस्तर माहिती तपासली असता केवळ १०० दिवसांमध्ये हर्षिता करोडपती झाल्याचे उघड झाले आहे. राज कुंद्रा पोर्न केसमध्ये नवनवी माहिती समोर येत असताना आता या प्रकरणातील कानपूर कनेक्शन समोर आले आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या अरविंद श्रीवास्तव याला हा अश्लील व्यवसाय खूप फायदेशीर ठरल्याचे दिसत आहे. अरविंद याची पत्नी हर्षिता ही १०० दिवांमध्येच करोडपती झाल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्यांदा चॅनल फ्लिज ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड करून अऱविंदची पत्नी हर्षिता हिच्या खात्यात ४० हजार रुपये ट्रान्सफर केले गेले. त्यानंतर १०० दिवसांमध्ये अरविंदने पत्नीच्या खात्यामध्ये २ कोटी १५ लाख रुपये ट्रान्सफर केले. हे पैसे पगाराच्या रूपात जमा करण्यात आले. मात्र कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार हर्षिता ही नोकरी करत नाही.