शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पतीला लागला वाईफ स्वॅपिंगचा नाद; पत्नीने मुंबईची ऑफर धुडकावली आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 2:39 PM

1 / 10
पती-पत्नीच्या पवित्र नात्याला बदनाम करणारा प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीसमोर लाजिरवाणी मागणी केली, जी पत्नीने धुडकावून लावल्याने संतापलेल्या पतीने मारहाण केली आणि सोडून निघून गेला. पीडित महिलेने पतीविरोधात पोलिसांत तक्रार केली. धक्कादायक म्हणजे हा व्याभिचारी पती रेल्वेचा कर्मचारी आहे.
2 / 10
ग्वालियरमध्ये 31 वर्षांच्या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. यामध्ये पती वाईफ स्वॅपिंगसाठी दबाव टाकत होता असे म्हटले आहे. तसेच तिच्याजवळ असलेले 15 लाख रुपये देखील हडप करून मुंबईला गेल्याचे म्हटले आहे.
3 / 10
या पीडित पत्नीने पती रेल्वेत असल्याचे सांगितले. पीडिता नर्स आहे. 2019 मध्ये तिचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. उदरनिर्वाहासाठी तिला पहिल्या पतीकडून ३० लाख रुपये रोख आणि 5 लाखांचे दागिने मिळाले होते.
4 / 10
यानंतर तिच्या आयुष्यात विनोद बघेल हा रेल्वे कर्मचारी आला. दतियामध्ये तो राहतो. सध्या त्याची पोस्टिंग मुंबईत आहे. जानेवारी 2020 मध्ये त्याने पीडितेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती.
5 / 10
विनोदने तिला सांगितले होते की, त्याला तिच्या आयुष्याबद्दल माहिती आहे. तरीही तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगितले व मागणी घातली. दोन्ही कुटुंबांनी याला संमती दिली आणि 26 जानेवारी 2020 मध्ये त्यांचे लग्न देखील झाले.
6 / 10
लग्न ठरल्यानंतर विनोदने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नाही अनैसर्गिक कृत्य देखील केले. लग्नानंतर दोघे 20 दिवस एकत्र राहिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
7 / 10
या २० दिवसांत गिरवाई भागात घर घेण्यासाठी त्याने पोटगीतून मिळालेले १५ लाख रुपये घेतले. नंतर समजले की घर कर्ज काढून घेतले आहे. बँकवाले पैसे मागायला लागल्यावर समोर आल्याचे ती म्हणाली.
8 / 10
लग्नानंतर जेव्हा लॉकडाऊन लागले तेव्हा विनोद आला नाही. त्यामुळे मी माहेरी गेले. काही दिवसांनी विनोद आला आणि मुंबईतील एका ग्रुपबद्दल त्याने सांगितले. तो त्याने जॉईन केला आहे. तिथे पत्नी बदलून सर्व मौज करतात, तू देखील चल आपणही मजा करू, असे सांगितले.
9 / 10
पत्नीने नकार दिल्यावर विनोदने मारहाण करण्यास सुरुवात केली व सोडून पुन्हा मुंबईला गेला. यानंतर त्याने कधीच फोन केला नाही.
10 / 10
डीएसपी विजय भदौरिया यांनी सांगितले की, पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तिचा पती विनोद बघेल यांच्याविरोधात फसवणूक आणि लैंगिक शोषण विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच तपास सुरु केला आहे.
टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस