थरकाप उडवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा तिच्या घराबाहेर गळा चिरून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 02:16 PM2022-02-13T14:16:14+5:302022-02-13T15:03:50+5:30

Murder Case : सुरतमधून व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी एक खळबळजनक आणि अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे.

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीची निर्घृणपणे हत्या केली आहे. भरदिवसा भररस्त्यात तरुणीचा गळा चिरला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सुरतमधील कामरेज येथील पसोदरा येथे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्येचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अतिशय हृदयद्रावक दृश्य पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरतमधील कामरेज येथील ही घटना आहे. एका तरुणाने भरदिवसा तरुणीचा गळा चिरून तिचा निर्घृणपणे खून केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणीचा पाठलाग करत होता. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी तरुणीच्या काकांनी या तरुणाला राग देखील दिला होता.

आज घटनेच्या दिवशी या तरुणाने या तरुणीच्या घराबाहेर जाऊन गोंधळ घातला. यानंतर एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या या तरुणाने प्रेयसीच्या भाऊ आणि वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

नंतर मैत्रिणीच्या गळ्यावर चाकू ठेवून या तरुणीला घराबाहेर काढलं. नंतर भरदिवसा सर्वांसमोर या तरुणाने त्या तरुणीचा गळा चिरला आणि नंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी विष प्राशन करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.

आरोपी तरुणाने तरुणीला पकडून तिच्या गळ्याजवळ चाकू धरला होता. त्यावेळी ही तरुणी मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरड होती. या तरुणाला समजावण्याचा जमलेल्या लोकांनी प्रयत्न केला. पण एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या या तरुणाने अखेर तिचा गळा चिरला.

तरुणीचा गळा चिरल्यानंतर आरोपीने स्वत: एका कागदाच्या पुडीतील विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

या भयंकर प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भरदिवसा एका मुलीचा गळा चिरुन हत्या केल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

असं क्रूर कृत्य करणाऱ्या या तरुणाला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. हा मुलगा कुठला होता आणि कुठून आला होता हे अद्याप कळू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा शोध घेतायत