मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:11 IST2025-09-12T17:06:38+5:302025-09-12T17:11:13+5:30
Love Relationship After Marriage: विवाहबाह्य संबंध का वाढू लागले, पुरुषाला दुसरीची किंवा बाहेरचीची गरज का वाटू लागली? महिलेला दुसरा पुरूष का आवडायला लागला? याची कारणे बरीच असतील...

आजकाल कुटुंबीयांच्या सहमतीने झालेल्या लग्नानंतरच नाही तर प्रेमविवाह करूनही महिला किंवा पुरुषांचे दुसऱ्यासोबत अफेअर सुरु असते. ते समोर आले की दोघांत बिनसते आणि मुलाबाळांचा विचार न करता घटस्फोटाची पायरी गाठली जाते. आता तर मुंबई, पुणे, दिल्लीसारखी मोठी शहरेच नाहीत तर छोट्या छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंधांचे प्रकार वाढू लागलेले आहेत.
हे विवाहबाह्य संबंध का वाढू लागले, पुरुषाला दुसरीची किंवा बाहेरचीची गरज का वाटू लागली? महिलेला दुसरा पुरूष का आवडायला लागला? याची कारणे बरीच असतील परंतू, यापैकी पाच कारणे ही सर्वाधिक विवाहबाह्य संबंधांच्या मागे आहेत.
या विवाहबाह्य संबंधांमुळे गुन्हे देखील वाढू लागले आहेत. पती-पत्नीचा काटा काढणे, त्या तिसऱ्या व्यक्तीचा काटा काढणे, मुलांना मारणे, मारहाण करणे आदी गोष्टी घडू लागल्या आहेत. या साऱ्यावर एक अभ्यास समोर आला आहे.
काय आहेत कारणे...
पूर्वी एकमेकांशी संपर्क साधण्याची साधणे खूप कमी होती. एखाद्या तरुणीशी बोलायचे असले तरी चिठ्ठी पाठविणे, कोणाकडे तरी निरोप देणे अशा गोष्टी केल्या जायच्या. महिलांशी संपर्क तर दूरच. परंतू आता डिजिटल माध्यमे एवढी तयार आहेत की लगेचच संपर्क साधता येतो. यामुळे महिला-पुरुष एकदम जवळ आले आहेत. झटकन संपर्क साधता येत असल्याने दोन्ही कडचे हालहवाल लगेचच कळत आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे भेटण्यासाठी उपलब्ध झालेल्या सोई. म्हणजेच रेस्टॉरंट, लॉज, हॉटेल. हे सर्व मोठ्याच शहरांत होते. परंतू आता ते छोट्या शहरांत उपलब्ध झाले आहे. पूर्वी प्रेमीयुगुलांना भेटण्यासाठी जागा कमी होत्या. आता बिनदिक्कत भेटता येत आहे. सोबत प्रायव्हसी देखील राहत आहे.
ही कारणे जरा पुढच्या स्टेजमधील आहेत, परंतू विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होण्यासाठी किंवा जोडीदार शोधण्यासाठी जी सुरुवात होते ती खरी घरातून, पती-पत्नीच्या नात्यातून होत आहे. सर्वात मोठे कारण म्हणजे गरज पूर्ण न होणे हे आहे. मग त्या आर्थिक असतील, भावनिक असतील किंवा शारिरीक. यामुळे महिला किंवा पुरुष बाहेर गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडू लागतो.
भावनिक नातेसंबंध हवे असणे ही देखील एक प्रकारची भूक आहे. अनेकदा पुरुषांपेक्षा महिला जास्त भावनिक नातेसंबंध शोधत असतात. त्याचा फायदा उचलला जातो आणि मग संबंध शारीरिक होण्यापर्यंत पोहोचतात.
एकटेपणाही...
अनेकजण नोकरी धंद्यानिमित्त बाहेर असतात. कामानिमित्त बाहेर असतात. मग एखादी महिला सहकारी किंवा पुरुष सहकारी आवडू लागतो आणि त्यातून पुढे संबंध सुरु होतात. एकमेकांना वेळ न देणे हे यामागचे मोठे कारण असते. एकटेपणा वाटू लागतो आणि मग पती किंवा पत्नी हा एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यातून विवाह बाह्य संबंध तयार होतात.