Sameer Wankhede Vs Nawab Malik: मुस्लिम दलितला नोकरीमध्ये आरक्षण मिळते? समीर वानखेडेंवरील नवाब मलिकांच्या आरोपात किती दम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:03 PM2021-10-29T12:03:55+5:302021-10-29T12:16:11+5:30

Sameer Wankhede Vs Nawab Malik on NCB Job: समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्यांचे पहिले लग्न मुस्लिम पद्धतीने निकाह करून झाल्याचे म्हटले आहे. वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. मुस्लम असून समीर यांनी दलित किंवा अनुसुचित जातीतील उमेदवाराची नोकरी बळकावली आहे, असा आरोप केला आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan khan Drug Case) एनसीबीचे मुंबई झोन संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यात जोरदार वाद रंगला आहे. आर्यन खानला काल जामिन मिळाला, त्यानंतर मलिक यांनी पिक्चर अभी बाकी है, असे ट्विट करून हा वाद पुढेही सुरुच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्यांचे पहिले लग्न मुस्लिम पद्धतीने निकाह करून झाल्याचे म्हटले आहे. वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. मुस्लम असून समीर यांनी दलिताची नोकरी बळकावली आहे, असा आरोप केला आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी वानखेडे हे टार्गेट करून पैसै उकळतात, आपल्या ओळखीच्या लोकांना सोडतात असा आरोप मलिक यांनी केला आहे. कार्डेलिया क्रूझवर एक दाढीवाला ड्रग्ज माफिया होता, ते सेक्स रॅकेटही चालवितो. त्याला वानखेडेंनी मित्र असल्याने चौकशी न करताच सोडून दिल्याचा आरोप केला आहे.

वानखेडेंच्या नोकरीवरून आता बराच वादंग सुरु आहे. वानखेडे यांनी आपण आईच्या इच्छेमुळे मुस्लिम पद्धतीने लग्न केल्याचे म्हटले आहे. पण ते हिंदू आहेत असे म्हटले आहे. मलिकांच्या म्हणण्यानुसार वानखेडे हे मुस्लिम आहेत आणि त्यांनी कागदोपत्री फसवणूक करून नोकरी मिळविल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी भारतीय संविधान काय म्हणते, ते पाहणे गरजेचे आहे. दलित मुस्लिम व्यक्तीला आरक्षणातून नोकरी मिळते का ते पहावे लागणार आहे... याबाबतची माहिती अमर उजालाने दिली आहे.

समीर दाऊद वानखेडे हे जन्मत: मुस्लिम आहेत, आणि त्यांनी दलित किंवा अनुसुचित जातीतून आयआरएसची नोकरी मिळविली आहे. हा आरोप करताना मलिक यांनी वानखेडेंचा निकाह फोटो, प्रमाणपत्र आणि जन्माचा दाखला देखील सादर केला आहे.

भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. भारताचे संविधान लोकांना धर्माचे स्वातंत्र्य देते आणि मौलिक अधिकारांची गॅरंटीदेखील देते. कायद्यानुसार अनुसूचित जातीसाठी सरकारी नोकरीमध्ये 15 टक्के आरक्षण आहे. ही तरतूद 1950 ची आहे. यामध्ये दोनवेळा बदल करण्यात आला आहे.

पहिले संशोधन 1956 आणि दुसरा 1990 मध्ये. यानुसार हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म मानणाऱ्या व्यक्तीशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीला अनुसुचित जातीचा सदस्य मानले जाणार नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशात मुसलमान दलित असल्याचे म्हटले आहे.

भारताच्या संविधानात धर्मच्या आधारावर नाही तर जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, काही राज्यांनी तसेच केंद्र सरकारने काही सूचींमध्ये मुस्लिम वर्गाला नोकरीत आरक्षण दिले आहे. हे आरक्षण मागास किंवा अति मागास वर्गाच्या रुपात मिळते, मुस्लिम म्हणून नाही.

यामुळे हे स्पष्ट आहे की, कोणीही मुस्लिम व्यक्ती दलित किंवा अनुसुचित जातीच्या कोट्यातून आरक्षणासाठी दावा करू शकत नाही. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर जो आरोप लावला आहे तो हाच आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 1950 मध्ये एका खटल्यामध्ये आदेश दिला होता. जर कोणताही व्यक्ती आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असेल तर त्याला तो जन्मत: अनुसुचित जातीतून आहे असे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. आंतरजातीय विवाह कोणत्याही व्यक्तीची जन्माची जातीला परिवर्तित म्हणजेच बदलू शकत नाही.

आंतरजातीय विवाहातून जन्माला येणाऱ्या अपत्यांना त्यांच्या वडिलांची जात लागेल. जर त्याची आई अनुसुचित जातीची असेल तर त्या मुलांना एसीसीचा सदस्य म्हमून संस्कार, पालन पोषन झाल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.

जर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर केलेले आरोप खरे सिद्ध झाले तर वानखेडेंना नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. एवढेच नाही तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल तसेच आजवर मिळालेले वेतन, भत्ते आदी देखील वसूल केले जातील.

Read in English