Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:28 IST2025-06-09T15:22:11+5:302025-06-09T15:28:21+5:30
Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : हनिमूनला गेलेल्या सोनमने आपल्या पतीचा काटा काढला आहे.

मेघालयातील इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्येचा मास्टरमाईंड सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज कुशवाह आणि कॉन्ट्रॅक्ट किलर्स आनंद, आकाश आणि विकी ठाकूर यांचे फोटो समोर आले आहेत.
हनिमूनला गेलेल्या सोनमने आपल्या पतीचा काटा काढला आहे. मेघालय पोलिसांनी सोनमला उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथून अटक केली आहे. तर इतर चार आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसह मिळून पती राजाच्या हत्येचा कट रचला होता. सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान असलेला राज कुशवाह हाच हत्येचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं आहे.
राज सोनमच्या वडिलांच्या इंदूरमधील प्लायवूड कारखान्यात काम करत होता, जिथे दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले. राजाची हत्या करण्यासाठी राजने आनंद, आकाश आणि विकी ठाकूर या तीन कॉन्ट्रॅक्ट किलर्सना सुपारी दिली.
मेघालयचे डीजीपी आय. नोंगरांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने लग्नापूर्वीच राज कुशवाहसोबत राजाला मारण्याचा प्लॅन केला होता. गेल्या महिन्यात ११ मे रोजी राजा आणि सोनमचं लग्न झालं होतं आणि नऊ दिवसांनी २० मे रोजी ते हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते.
२३ मे रोजी नोंगरियाट गावातील शिप्रा होमस्टेमधून चेक आउट केल्यानंतर, राजाची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह वेइसावडोंग धबधब्याच्या जवळील एका दरीत फेकण्यात आला. २ जून रोजी मृतदेह सापडला. तर सोनमला आज गाझीपूरमधील एका ढाब्यावरून अटक केली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बॉयफ्रेंड राज कुशवाह सतत सोनमच्या संपर्कात होता आणि प्लॅननुसार पुढे जात होता. मेघालयातील मावलाखियाक टुरिस्ट गाईड अल्बर्ट पीडीच्या जबाबातून पोलिसांना महत्त्वाचे संकेत मिळाले,
ज्यामध्ये अल्बर्टने सांगितलं की, राजा आणि सोनमसोबत आणखी तीन पुरुषांना पाहिलं होतं. तिघेही हिंदीत बोलत होते, त्यामुळे फारसं काही समजू शकलं नाही, येथून पोलीस तपासात महत्त्वाचे पुरावे सापडले.
९ जून रोजी सोनम गाझीपूरच्या नंदगंज भागातील एका ढाब्यावर पोहोचली. तिथून तिने ढाबा ऑपरेटरचा फोन घेतला आणि तिच्या भावाला व्हिडीओ कॉल केला आणि ती गाजीपूरमध्ये असल्याचं सांगितलं.
भावाने ताबडतोब इंदूर पोलिसांना माहिती दिली, त्यांनी गाझीपूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सोनमला वैद्यकीय तपासणीसाठी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. तपासात कोणतीही जखम किंवा मारहाणीच्या खुणा आढळल्या नाहीत.