पतीसोबत झोपली असताना महिलेवर तरूणाने केला रेप, म्हणाली - मला वाटलं तो माझा पती; पोलीस कन्फ्यूज

Published: May 17, 2021 12:56 PM2021-05-17T12:56:47+5:302021-05-17T13:13:08+5:30

महिलेने झोपते तिथेच रेप झाल्याचं सांगितलं. पोलिसांना या गोष्टीचा संशय आहे की, झोपल्या जागेवर रेप होत होता आणि पतीला काहीच कसं समजलं नाही.

मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. घटना अशी आहे की, पोलीस विभागही कन्फ्यूज झाला आहे. रीवाच्या मउंगज भागातील एका महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा ती रात्री पतीजवळ झोपलेली असताना एक तरूण आला. आणि रेप करून गेला. (छायाचित्रे- प्रातिनिधिक)

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे महिलेने सांगितलं की, तिला वाटलं की, तरूण तिचा पती आहे. त्यामुळे तिने त्याला अडवलं नाही. महिला म्हणाली की, जेव्हा तिला याबाबत समजलं की, तेव्हा तिने आरडाओरड केली. पण तोपर्यंत तरूण तेथून पसार झाला होता.

महिलेने सांगितलं की, ती तिच्या पतीसोबत एका झोपडीत राहते. रात्री ती पती आणि आपल्या पाच वर्षांच्या मुलासोबत झोपलेली होती. तेव्हाच रात्री एक तरूण झोपडीत आला आणि अंधाराचा फायदा घेत त्याने तिच्यावर रेप केला.

महिलेला वाटलं की, तो पती आहे. ज्यामुळे ती त्याला काहीच बोलली नाही. पण नंतर जेव्हा तिला जाणीव झाली की पती तर झोपला आहे तेव्हा तिला या घटनेबाबत समजलं.

त्यानंतर तिने आरडाओरड सुरू केली. तेव्हा पती उठला आणि त्याने आरोपीला धरलं. पण तो झटका देऊन पसार झाला. सकाळी महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली.

आरोपी अजूनही फरार आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी पाहिलं की, महिला राहते ती जागा फारच छोटी आहे. फार कमी जागेत पती आणि ती झोपते.

महिलेने झोपते तिथेच रेप झाल्याचं सांगितलं. पोलिसांना या गोष्टीचा संशय आहे की, झोपल्या जागेवर रेप होत होता आणि पतीला काहीच कसं समजलं नाही.

याबाबत एसएसपी विजय डाबर म्हणाले की, एका २७ वर्षीय महिलेने रेपची तक्रार नोंदवली आहे. महिलेने सांगितलं की, जेव्हा ती १३ मे रोजी पतीसोबत घरात झोपलेली होती तेव्हा तिच्यासोबत रेप झाला.