सावधान! तुमच्या मोबाईलमध्ये ‘जोकर’ने प्रवेश केलाय का? सायबर पोलिसांचं सतर्कतेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 10:58 AM2020-07-15T10:58:24+5:302020-07-15T11:01:47+5:30

महाराष्ट्र पोलिस सध्या एका ‘जोकर’चा तपास करत आहे जो लोकांच्या पैशावर डल्ला मारत आहे. हा जोकर प्रत्यक्षात एक मैलवेयर (हानिकारक संगणक सॉफ्टवेअर) आहे ज्याने पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ११ एंड्रॉयड अॅप्सना लक्ष्य केले आहे.

सूत्रांच्या मते, पैशांचे ट्रान्सफर करण्याशिवाय मैलवेयर डेटा व ओळख चोरू शकतो. महाराष्ट्र सायबर शाखेने या विरोधात लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे.

महाराष्ट्र सायबर शाखेचे विशेष निरीक्षक जनरल यशस्वी यादव यांनी सांगितले की, काही एंड्रॉयड अॅप्सद्वारे स्मार्टफोनमध्ये मैलवेयर डाऊनलोड होत असल्याची घटना समोर आली आहे. रिसर्चच्या आधारे, ११ एंड्रॉयड अॅप्समध्ये जोकर मैलवेयर आढळून आला आहे.

हा जोकर मैलवेयर युजर्सच्या परवानगीशिवाय पैसे ट्रान्सफर करु शकतो आणि त्याचसोबत स्मार्टफोनमधील डेटा चोरी करु शकतो.

हा मैलवेयर युजर्सच्या नकळत बँकेतून पैसे ट्रान्सफर करतो, जाहिरातीच्या माध्यमातून स्मार्टफोनच्या एसएमएसपर्यंत पोहचतो, त्याठिकाणी ओटीपी आल्यानंतर पेमेंटसाठी परवानगी देतो, हा सगळा प्रकार युजर्सला माहिती होत नाही, गुगलने या ११ एंड्रॉयड अॅप्सना ब्लॉक केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार हे हानिकारण एंड्रॉयड अॅप्स अनइस्टॉल करण्यासोबतच एंड्रॉयड युजर्सने मोबाईल आणि क्रेडिट कार्ड बिल्सही चेक केले पाहिजेत, ज्यामुळे नकळत त्यांनी कोणत्याही सब्सक्रिप्शन सर्विस सुरु केल्या नाहीत ना हे पाहायला हवं.

त्यासोबत रेग्युलर स्कॅनिंग, ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करणे, सिक्युरिटी सल्यूशन इंस्टॉल करुन भविष्यात कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा.

महाराष्ट्र सायबर गुन्हे शाखेने ११ एंड्रॉयड अॅप्सची लिस्ट जारी करत त्यांना मोबाईलमधून काढण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.

यात com.imagecompress. android, com.relax, relaxation. androidisms, com-.cheery.message-.sendsms (two different instances), com.peason-.lovinglovemessage, com.contact.withme-.texts and com.training-.memorygame. या अॅप्सचा समावेश आहे.