...म्हणून तिनं आईचा मृतदेह तब्बल १० वर्षे घरातल्या फ्रिजमध्ये ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:27 PM2021-01-30T17:27:18+5:302021-01-30T17:30:48+5:30

आई आणि लेकराच्या नात्याची तुलता जगात कशासोबतही होऊ शकत नाही. आपलं मूल कसंही असलं तरी आई त्याच्यावर जीवापाड प्रेम करतं.

आई दिसली नाही की मूल सैरभैर होतं. कारण हे नातं जगावेगळं असतं. मात्र जपानमध्ये एक भलतीच घटना घडली आहे. हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

जपानमध्ये एका महिलेने तिच्या आईचा मृतदेह १० वर्षांपासून फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता. आईला मिळालेल्या सदनिकेत आरामात राहावं यासाठी आपण हे कृत्य केल्याचं महिलेनं सांगितलं.

आपल्याला कोणी घराबाहेर काढू नये. आईला मिळालेल्या घरात आपल्याला राहता यावं यासाठी आपण आईचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्याचं महिलेनं सांगितलं.

आईचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवणाऱ्या महिलेचं नाव योशिनो आहे. तिनं तब्बल १० वर्षांपासून आईचा मृतदेह लपवून ठेवला होता.

योशिनोच्या आईला ठराविक कालावधीसाठी सदनिका देण्यात आली होती. हा कालावधी संपल्यानं नगर पालिकेचं पथक घर रिकामं करण्यासाठी पोहोचलं. त्यावेळी ही बाब उघडकीस आली.

आईचं निधन झालं त्यावेळी योशिनोचं वय ६० वर्षे होतं. योशिनो यांनी आईचा मृतदेह लपवून ठेवल्याचं लक्षात येताच परिसरात खळबळ माजली.

योशिनो यांच्या आईच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेमुळे सगळेच चक्रावून गेले आहेत.

Read in English