शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षात ६ राज्यात गोल्ड चोरी! ४०० किलो सोने लुटणारा 'बुबआ' आहे कोण?; पुणे-नागपूरशी कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:23 IST

1 / 10
देशभरात मोठ्या प्रमाणात गोल्ड चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अखेर राजस्थान पोलिसांच्या हाती लागला आहे. सुबोध सिंह उर्फ बबुआ याच्यावर जवळपास १० वर्षात ६ राज्यात ४०० किलोहून अधिक सोने चोरीचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद आहे.
2 / 10
राजस्थानच्या राजसमंद येथील कांकरोली पोलिसांनी सुबोध सिंहला २ वर्ष जुन्या गोल्ड चोरीत ओडिशातून अटक केले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, सुबोधने त्याच्या टोळीसोबत मिळून २०१८ पर्यंत जयपूर, पुणे, नागपूर आणि बॅरकपूरसह अनेक बड्या शहरात चोरी केली आहे.
3 / 10
सुबोध सिंह उर्फ​ बबुआ हा बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील चिस्तीपूर गावचा रहिवासी आहे. १२वी पास असलेला हा मास्टरमाइंड १९९६ मध्ये छोट्या गुन्हेगारी नेटवर्कसोबत काम करू लागला आणि तुरुंगात असताना त्याने त्याची टोळी हळूहळू मजबूत केली आणि जामिनावर सुटल्यानंतर त्याने मोठ्या ज्वेलर्स आणि बँकांना लक्ष्य केले. ईश्वर प्रसाद कुर्मी यांचा ४२ वर्षीय मुलगा सुबोध सिंह याच्यावर देशातील विविध राज्यांमध्ये दरोडा, खून आणि दरोड्याचे ४२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
4 / 10
१९९९ पर्यंत पोलीस खबऱ्या म्हणून काम करत होता. या काळात त्याने बिहार एसटीएफ कर्मचाऱ्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली, हे काम त्याने २००७ पर्यंत चालू ठेवले. या काळात सुबोधला बिहार एसटीएफ आणि पोलिसांची प्रत्येक शैली आणि युक्ती चांगलीच समजली.
5 / 10
सुबोध प्रत्येक गुन्ह्यासाठी एक संपूर्ण प्लॅनिंग बनवायचा आणि त्याच्या टोळीतील सदस्यांना जबाबदाऱ्या सोपवत असे. प्रत्येक दरोड्यातून १५-३० किलो सोने हडपले जात होते. त्यानंतर ही टोळी चोरीचे सोने नेपाळ आणि पश्चिम बंगालमध्ये नेत असे जिथे ते वितळवून विकले जात असे. सातत्याने पोलीस सुबोध सिंहच्या मागावर होती. अखेर त्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली.
6 / 10
२३ ऑगस्ट २०२३ रोजी चार दुचाकीस्वार हल्लेखोरांनी कांकरोली येथील रूपम गोल्ड ज्वेलर्समधून तीन किलो सोने आणि १८ लाख रुपये रोख लुटले.पोलिसांनी या प्रकरणात सुबोध सिंह आणि इतर दोन आरोपींना अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार सुबोधविरुद्ध दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांमधून चोरीला गेलेले एकूण सोने अंदाजे ४०० किलो आहे.
7 / 10
सुबोधने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्याने खबरी देता देता गुन्हेगारी नेटवर्क बनवले होते. २००८ मध्ये त्याने कोलकाता येथील आयओबी बँकेत आणि नंतर रायपूर येथील बँकेत दरोडे टाकला. या प्रकरणांमध्ये त्याला आधी कोलकाता पोलिसांनी आणि नंतर रायपूर पोलिसांनी अटक केली होती.
8 / 10
२०१५ पर्यंत रायपूर तुरुंगात होता. जामिनावर सुटल्यानंतर त्याने मुथूट, मन्नापुरम आणि इतर मोठ्या ज्वेलर्सना लक्ष्य केले. दरोडे घालण्यासाठी त्याने स्वतःची टोळी देखील तयार केली. २०१८ पर्यंत त्याने महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, राजस्थानातील जयपूर आणि पश्चिम बंगालमधील बराकपूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दरोड्याच्या घटना घडवून आणल्या.
9 / 10
जानेवारी २०१८ मध्ये बिहार एसटीएफने सुबोधला बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील दानापूर येथून अटक केली जेव्हा तो त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. मात्र पोलीस चौकशीत सुबोधने माझी कुणी प्रेयसी नव्हती, मला रस्त्यातून उचलण्यात आले असं सांगितले. त्याच्याकडून १६.५ किलो सोने, एक पिस्तूल आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले होते.
10 / 10
तुरुंगात असतानाही सुबोध सिंह विविध राज्यांमध्ये गुन्हे घडवत होता. सुबोध सिंह पाटण्याच्या बेऊर तुरुंगातील सेक्टर ३ मधील २१ आणि २२ क्रमांकाच्या बॅरेकमध्ये होता. तिथे त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट आणि लक्झरी सुविधा मिळत होत्या. या दोन्ही बॅरेकमध्ये फक्त सुबोध सिंहच्या टोळीतील सदस्य आणि त्याच्या ओळखीचे लोक राहत होते.
टॅग्स :theftचोरीGoldसोनंCrime Newsगुन्हेगारी