अबब! ५० हजार सॅलरी अन् घरी सापडला कोट्यवधीचा खजिना; अधिकारी मोजून मोजून थकले तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:34 PM2021-10-01T12:34:51+5:302021-10-01T12:44:38+5:30

भारतात नेहमी कुठे ना कुठे भ्रष्टाचाराच्या बातम्या समोर येत असतात. अगदी शिपायापासून ते अधिकाऱ्यापर्यंत सगळेच यात सहभागी असतात. काही अधिकारी, कर्मचारीच प्रामाणिकपणे स्वत:चं काम करताना दिसून येतात. मात्र जोपर्यंत भ्रष्टाचार समोर येत नाही तोवर सगळं काही आलबेल असतं.

मध्य प्रदेशात भ्रष्टाचाराचं एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात ५० हजारांची नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली असता कोट्यवधीची संपत्ती, लग्झरी गाड्या आणि रोख रक्कम पाहून आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी चक्रावले.

बंगला, फॉर्म हाऊस, मल्टी फ्लॅट आणि मॉलमध्ये दुकानं. हे सगळं मध्य प्रदेशातील टीएंडसीपी अधिकाऱ्याकडे सापडले आहे. ही केवळ दाखवण्याची संपत्ती आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या छापेमारीत टीएंडसीपी अधिकारी विजय दरयानी यांच्या घरी १९ लाखांची रोकड सापडली.

या अधिकाऱ्याकडे सापडलेला खजिना पाहून धाड टाकणारे अधिकारीही हैराण झाले. विजय दरयानी यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली. यावेळी त्यांच्या घराबाहेर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. बेसुमार संपत्तीचे मालक विजय दरयानी मालक आहेत. त्यांच्याकडे माउंटबर्ग टाऊनशिपमध्ये लग्झरी फॉर्म हाऊस आहे ज्याची किंमत ३ कोटी आहे.

त्यासोबतच आशिष नगरमध्ये एक बंगला, ज्याची किंमत ३ कोटींची आहे. एका अपार्टमेंट २ फ्लॅट, ज्याची किंमत १ कोटींपर्यत आहे. यातील काही संपत्ती अधिकारी विजय यांनी त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केली आहे. त्यासोबत त्यांच्याकडे ४ कोटींची जमीनही आहे.

आत्ताच्या घडीला टीएंडसीपी अधिकारी विजय दरयानी यांची ५० हजार सॅलरी आहे. परंतु त्यांच्याकडे १ कोटींच्या तीन लग्झरी गाड्या आहेत. इतके पैसे त्यांनी कुठून आणले असतील त्याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. विजय दर्यानी यांची पोस्टिंग देवास येथे आहे. ते कन्ट्री अँन्ड प्लॅनिंगचे आर्टिटेक आहे. त्यात शाजापूरचा कार्यभारही आहे. या काळात काळ्या पैशातून कोट्यवधींची संपत्ती कमावली गेली आहे.

विजय दरयाणी भ्रष्टाचाराच्या पैशाने खूप श्रीमंती दाखवायचा. त्याच्या बंगल्याच्या छतावर बाग आहे. बागेत लाखो रुपयांची रोपे आहेत. बागेत २५ हजार बोन्सायचं झाड देखील आहे. ईओडब्ल्यू टीम छताच्या बागेत लावलेल्या झाडांचीही तपासणी करत आहे. अखेर इतके पैसे त्याने कुठून आणले त्याबाबत ईओडब्ल्यू गुन्हा नोंदवून तपास करत आहे

विजय दरयानीच्या घरातून १९ लाख रुपये रोख मिळाले आहेत. ईओडब्ल्यूचे एसपी दिलीप सोनी म्हणाले की, त्यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्तेची तक्रार प्राप्त झाली होती. ते इंदूरमध्येही कार्यरत होते. या दरम्यान, मास्टर प्लॅनमध्ये अनियमिततेच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. इंदूरसह त्यांच्या पाच ठिकाणी छापेमारी सुरू आहे. काही मालमत्ता त्याच्या भावाच्या नावावर आहे.

विजय दरयानी हे त्यांच्या घरातून कार्यालय चालवत होते. EOW टीमला इंदूर आणि देवास येथील घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत, जी सरकारी आहेत. यासोबतच काही नवीन प्रकल्पांचे मास्टर प्लॅनही प्राप्त झाले आहेत. या सर्वांची चौकशी केली जात आहे.

छाप्यादरम्यान घरात लक्झरी वस्तू सापडल्या. ईओडब्ल्यू अधिकारी हे पाहून आश्चर्यचकित झाले. आतापर्यंत एकूण १५ कोटी रुपयांची संपत्ती उघड झाली आहे. त्याचबरोबर घरातून सापडलेल्या दागिन्यांची तपासणी अजूनही सुरू आहे.