हॉटेलमध्ये तासन्तास भेट, उशिरा रात्री व्हिडिओ कॉल...लव्ह-ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या DSP कल्पना वर्मा कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:01 IST2025-12-10T17:46:11+5:302025-12-10T18:01:55+5:30
छत्तीसगढ पोलिस दलातील युवा महिला अधिकारी डीएसपी कल्पना वर्मा सध्या एका मोठ्या वादामुळे चर्चेत आल्या आहेत.

रायपुरमधील व्यावसायिक दीपक टंडन यांनी डीएसपी कल्पना वर्मावर 'लव्ह ट्रॅप'मध्ये फसवून सुमारे २.५ कोटी रोख रक्कम, एक लक्झरी कार, डायमंड रिंग आणि लाखोंचे दागिने उकळल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे वर्दीधारी पोलिसांच्या प्रतिमेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कल्पना वर्मा या छत्तीसगढ पोलिसांच्या २०१६-१७ बॅचच्या युवा महिला अधिकारी आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात रायपूरमध्ये माना पोलिस स्टेशन आणि एटीएसमध्ये काम केले आहे. त्या सध्या छत्तीसगढच्या संवेदनशील आणि नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या दंतेवाडा येथे डीएसपी म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या कार्यकाळात त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात भाजपचे नेते निवेदन देण्यासाठी आले असताना त्या मोबाईल पाहण्यात मग्न होत्या, या घटनेमुळे त्या सोशल मीडियावरही व्हायरल झाल्या होत्या.

रायपूरचे व्यावसायिक दीपक टंडन यांनी खम्मरडीह पोलिस स्टेशनमध्ये डीएसपी कल्पना वर्मा यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. २०२१ मध्ये एका मित्राच्या माध्यमातून दोघांची छोटी भेट झाली. त्यानंतर कल्पना वर्मा यांनी सतत फोन करून भेटायला सुरुवात केली. हॉटेलमध्ये तासन्तास बसणे आणि उशिरा रात्री व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरू झाले.

टंडन त्यांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर कल्पना वर्मा यांनी वेगवेगळ्या बहाण्याने पैसे, दागिने आणि इतर महागड्या वस्तू मागण्यास सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांत डीएसपी वर्मा यांनी टंडन यांच्याकडून एकूण २.५ कोटींहून अधिक किमतीची फसवणूक केली.

यात २ कोटी रोख, एक लक्झरी कार, १२ लाखांची डायमंड रिंग, ५ लाखांचे सोन्याचे दागिने आणि एका हॉटेलच्या प्रॉपर्टीचे मालकी हक्कही समाविष्ट आहेत. कल्पना यांनी त्यांच्या भावाला हॉटेल उघडण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतले. त्यांनी टंडन यांच्यावर त्यांच्या पत्नीला घटस्फोट देण्याचा दबाव टाकला.

जेव्हा टंडन यांनी पैसे परत मागितले, तेव्हा वर्दीचा धाक दाखवून त्यांना धमकावले. कल्पना यांचे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याने त्या सातत्याने धमकावत राहिल्या. टंडन यांनी त्यांच्या तक्रारीसोबत व्हाट्सएप चॅट्स, व्यवहारांचे स्क्रीनशॉट्स आणि इतर पुरावे पोलिसांना सादर केले आहेत.

डीएसपी कल्पना वर्मा यांनी सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या या सर्व आरोपांना पूर्णपणे निराधार आणि खोटे ठरवले आहे. त्यांनी हे प्रकरण राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.

या व्हायरल पोस्ट आणि आरोपांवर छत्तीसगढ पोलीस विभाग किंवा डीएसपी कल्पना वर्मा यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, खाकी वर्दीवर झालेल्या या गंभीर आरोपांमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
















