महिलांना घाबरवून ऑपरेशन करत होता डॉक्टर; कोर्टाने सुनावली 465 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 11:45 AM2020-11-12T11:45:43+5:302020-11-12T12:05:50+5:30

अमेरिकेच्या व्हर्जिनियामधील एका डॉक्टरला रूग्णांचे अनावश्यक ऑपरेशन केल्याबद्दल 465 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गायनोलॉजिस्ट (स्त्रीरोगतज्ज्ञ) असलेल्या या डॉक्टरचे नाव डॉ. जावेद परवेझ असे आहे. त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला आहे की, गरज नसतानाही त्यांनी रुग्णांचे ऑपरेशन केले आहे.

अमेरिकेच्या कोर्टाने सोमवारी रुग्णांना जबरदस्तीने ऑपरेशन करण्यास भाग पाडल्याच्या आरोप ठेवत डॉ. जावेद परवेझ यांना दोषी ठरविले.

कोर्टाने मान्य केले की, या डॉक्टरने खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांना कोट्यवधी डॉलर्सचे बिल देऊन बरेच पैसे कमावले. जवळपास २०१० पासून असे काम या डॉक्टरकडून होत असल्याचे सांगण्यात आले.

कोर्टाच्या रेकॉर्डनुसार असे समजते की, या डॉ. जावेद परवेझ यांनी गर्भवती महिलांना ऑपरेशनद्वारे प्रसुती करण्यास भाग पाडले. तसेच, पर्यायी अपरिवर्तनीय नसबंदीच्या प्रतीक्षा कालावधीचे उल्लंघन केले आणि त्याबदल्यात विमा कंपन्यांना हजारो डॉलर्सची बिले दिली, जी अनधिकृत होती.

कोर्टाच्या रेकॉर्डनुसार, डॉ. जावेद परवेझ हे आपल्या रूग्णांना ऑपरेशन आवश्यक असल्याचे सांगत होते. तर काही वेळा त्यांनी रुग्णांना कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी रुग्णांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता.

एफबीआयच्या नॉरफॉक फील्ड ऑफिसचे प्रभारी एजेंट कार्ल शूमन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की," डॉक्टर, प्राधिकरणाचे लोक आणि विश्वासू पदांवर असलेले लोक त्यांच्या रूग्णांचे नुकसान करु नये अशी शपथ घेतात."

अनावश्यक, आक्रमक शस्त्रक्रिया प्रक्रियेसह डॉ. जावेद परवेझ यांनी रूग्णांना फक्त वेदनाच दिल्या नाहीत, तर त्यांनी रुग्णांच्या वैयक्तिक भागावर हल्ला केला आणि त्यांचे भविष्य सुद्धा लुटले, असे कार्ल शूमन यांनी म्हटले आहे.

Read in English