जगातील सर्वात महागड्या 'केस स्टडी'तून आयडिया; आफताबने दिल्ली-मुंबई पोलिसांना दिलेला चकवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 12:09 PM2022-12-06T12:09:03+5:302022-12-06T12:16:01+5:30

मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आरोपी आफताबचा इंटरनेट सर्च हिस्ट्री तपासल्यानंतर अनेक नवे खुलासे झाले आहेत.

मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आरोपी आफताबचा इंटरनेट सर्च हिस्ट्री तपासल्यानंतर अनेक नवे खुलासे झाले आहेत. आफताबने श्रद्धाच्या हत्येनंतर काही काळानंतर जून महिन्यात झालेला जगातील सर्वात महागडा खटला अनेक वेळा पाहिला आणि वाचला होता. या प्रकरणातून त्याने कायद्याच्या सर्व युक्त्यांबद्दलची माहिती घेतली होती.

श्रद्धाच्या हत्येनंतर मुंबई पोलीस श्रद्धाच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करत असताना आफताबची अनेकवेळा चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी आफताबही मुंबई पोलिसांची दिशाभूल करण्यात यशस्वी झाला होता. श्रद्धाने त्याला सोडल्याचा दावा त्याने मुंबई पोलिसांसमोर केला होता, ज्यावर मुंबई पोलिसांनी विश्वास दाखवत आफताबला सोडले.

दिल्ली पोलिसांनी आफताबची श्राद्धाबाबत अनेकवेळा चौकशीही केली होती, ज्यामध्ये तो दिल्ली पोलिसांची दिशाभूल करत होता. आता आफताबच्या इंटरनेट सर्च हिस्ट्रीवरून अनेक खुलासे उघड झाले आहेत. त्याने कायदेशीर हेराफेरीची प्रत्येक युक्ती आधीच जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. ज्याचा त्याने तपासादरम्यान दिल्ली-मुंबई पोलिसांसमोर उपयोग केला.

हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेपची पत्नी अंबर हर्डने 2018 मध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, ती घरगुती हिंसाचाराची शिकार झाली होती. जॉनीने आपले शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचे तिने म्हटले होते. यानंतर जॉनीने आपल्या पत्नीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. या प्रकरणाची जगभर चर्चा झाली. या खटल्यात 100 तास साक्ष झाली आणि जॉनीच्या वतीने न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

हे प्रकरण जगभर लाइव्ह पाहायला मिळाले होते. जो आफताब सुद्धा श्रद्धाला मारल्यानंतर दिल्लीच्या त्याच फ्लॅटमध्ये बसून पाहत होता. जॉनी डेपने मानहानीचा खटला जिंकला आणि त्याला 15 मिलियन डॉलर नुकसान भरपाई मिळाली.

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब तिहार तुरुंगात आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर त्याच रात्री श्रद्धाच्या शरीराचे काही भाग तुकडे करून बाकीचे सोडून दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शरीराच्या उर्वरित भागांचे तुकडे केल्याचा त्याने खुलासा केला.

शरीराचे तुकडे करण्यासाठी त्याने करवत्यासह अनेक धारदार शस्त्रांचा वापर केला. आफताबने जवळपास 4 महिने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तो अतिशय थंड मनाने सर्व काही करत होता. सगळे पुरावे खोडून काढत होता. श्रद्धाचा मृतदेह कुठे आणि कसा लपवायचा, याचाच तो सतत विचार करत होता, असं आफताबने चौकशीदरम्यान सांगितले.