‘खान’ कुटुंबातून आऊट झालेल्या मलायकाने ‘कपूर’ कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 11:50 AM2021-11-05T11:50:31+5:302021-11-05T12:03:50+5:30

Arjun Kapoor & Malaika Arora : मलायका व अर्जुन कपूर दोघांनीही आपलं नातं कधीच ऑफिशिअल केलं आहे. आता तर अर्जुनच्या कुटुंबीयांनीही मलायकाला स्वीकारलं आहे.

होय, बॉलिवूडची ‘मुन्नी’ मलायका अरोरा ‘खान’ कुटुंबातून आऊट झाली आहे आणि आता ‘कपूर’ घराण्यात तिची एन्ट्री झालीयं. काल रात्री मलायकाने कपूर कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.

अनिल कपूर यांच्या घरी दिवाळी पार्टी झाली. या पार्टीत मलायका बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत पोहोचली.

गुलाबी साडीत मलायका अतिशय सुंदर दिसत होती. अर्जुन कपूरसोबत तिने जबदस्त पोझ दिल्यात.

मलायका व अर्जुन कपूर दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं मानलं जातंय.

अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका व अर्जुन अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसतात.

बोनी कपूर हेही आपल्या दोन्ही लेकींसह या पार्टीत पोहोचले होते.

जान्हवी कपूर व खुशी कपूर या पार्टीची शान वाढवली. पण सर्व लक्ष वेधलं ते मलायकाने.

संजय कपूरची लेक शनाया कपूरही या पार्टीत सामील झाली होती. हिरव्या साडीत तिने धमाकेदार एन्ट्री घेतली.

Read in English