तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ४६,१८,३८५ रुपये; पाहा 'या' सरकारी योजनेत दरवर्षी किती करावी लागेल गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 08:38 IST2026-03-25T08:24:54+5:302026-03-25T08:38:28+5:30
Sukanya Samriddhi Yojana Calculator: केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारेही मुलींसाठी अनेक बचत योजना राबवत आहेत. पाहूया कोणती आहे ही स्कीम ज्यात मुलींना मोठ्या प्रमाणात रक्कम मिळू शकते.

Sukanya Samriddhi Yojana Calculator: केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारेही मुलींसाठी अनेक बचत योजना राबवत आहेत. केंद्र सरकारची 'सुकन्या समृद्धी योजना' ही एक अत्यंत लोकप्रिय योजना असून, तिची सुरुवात २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात झाली होती.

या योजनेअंतर्गत मुलींना ८.२ टक्के इतकं भरघोस व्याज मिळत आहे. विशेष म्हणजे, देशातील इतर कोणत्याही योजनेत मुलींना एवढं व्याज मिळत नाही. या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे करमुक्त (Tax-free) आहे, म्हणजेच यातून होणाऱ्या कमाईवर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स द्यावा लागत नाही.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत (SSY) केवळ १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीचंच खातं उघडता येतं. या खात्यात दरवर्षी किमान २५० रुपये जमा करणे आवश्यक आहे. या योजनेत तुम्ही मुलीच्या नावाने एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

या सरकारी योजनेत तुम्हाला १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. हे खातं उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी मॅच्युअर होतं. जर मुलगी १८ वर्षांची झाली असेल आणि तिचं लग्न करायचे असेल, तर अशा परिस्थितीतही तुम्ही खातं बंद करू शकता, त्यानंतर सर्व पैसे मुलीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात.

या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींची खाती उघडता येतात. मात्र, ज्या कुटुंबात जुळ्या मुली आहेत, तिथे २ पेक्षा जास्त मुलींची खाती उघडली जाऊ शकतात. तुम्ही देशातील कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हे खातं उघडू शकता.

जर तुमच्या मुलीचं वय सध्या १ वर्ष असेल आणि तुम्ही तिचं खातं उघडलं, तर मॅच्युरिटीनंतर तिला ४६,१८,३८५ रुपये मिळू शकतात. यासाठी तुम्हाला १५ वर्षांपर्यंत दरवर्षी १,००,००० रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच, मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला दरमहा ८,३३४ रुपयांची बचत करावी लागेल.

















