American Bourbon Whiskey: भारताने केली ५० टक्के टॅरिफ कपात, बॉर्बन व्हिस्की मिळणार स्वस्तात; का आहे खास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:01 IST2025-02-17T12:54:27+5:302025-02-17T13:01:11+5:30
American Bourbon Whiskey : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे अमेरिकन बॉर्बन व्हिस्की चर्चेत आली आहे. भारताने अमेरिकन बॉर्बन व्हिस्कीच्या आयातीवरील करामध्ये ५० टक्के कपात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्याची बैठक झाली. या बैठकीतील चर्चेनंतर भारताने अमेरिकन बॉर्बन व्हिस्की (American Bourbon Whiskey) वरील आयात कर ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. जो देश अमेरिकन वस्तूंवर जास्त कर आकारेल, त्यांच्यावर तितकाच कर लावला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय चर्चत आला आहे.
बॉर्बन व्हिस्की (American Bourbon Whiskey) भारतात निर्यात करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका प्रमुख देश आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, भारतात येणाऱ्या एकूण दारूपैकी एक चतुर्थांश दारू अमेरिकेतून निर्यात केली जाते.
१८०० मध्ये पहिल्यांदा तयार करण्यात आलेल्या या व्हिस्की गोष्ट खूपच रंजक आहे. ही व्हिस्की तयार करण्याची प्रक्रिया खूपच किचकट आहे.
बॉर्बन व्हिस्की ही एकमेव दारू आहे की जी अमेरिकेची आहे. ही अमेरिकन व्हिस्की मका, राई, पीठ, आणि माल्ट याच्यापासून बनवली जाते. बॉर्बन व्हिस्कीमध्ये ५१ टक्के मका असतो. या सगळ्या गोष्टी ओक लाकडापासून बनवलेल्या पिंपात ठेवल्या जातात.
हा लाकडी पिंप आधी आतू थोडा भाजला जातो. त्यानंतर त्यात दारू भरली जाते. यात कोणताही रंग किंवा फ्लेवर मिसळला जात नाही. या व्हिस्कीमध्ये ८० ते १६० पर्यंत अल्कोहोल असते. सन १८०० मध्ये पहिल्यांदा अमेरिकेमध्ये ही व्हिस्की तयार करण्यात आली होती.
या व्हिस्कीचे नाव बॉर्बन व्हिस्की कसे पडले, याचाही एक इतिहास आहे. अमेरिकेमध्ये बॉर्बन काऊंटी नावाचे एक राज्य आहे. बॉर्बन काऊंटीमधील केंटकी येथे पहिल्यांदा ही व्हिस्की तयार करण्यात आली होती. त्यामुळे या जागेच्या नावावरून या व्हिस्कीचे नाव बॉर्बन व्हिस्की पडले.
अमेरिकेमध्ये बॉर्बन व्हिस्की याच ठिकाणी तयार केले जाते. वर्ष १९६४ मध्ये अमेरिकन काँग्रेसने (संसद) बॉर्बन व्हिस्कीला अमेरिकेचे खास प्रोडक्ट म्हणून जाहीर केले. बॉर्बन व्हिस्की अमेरिकेतील प्रसिद्ध मद्य असून, भारतातही या व्हिस्कीचा खप चांगला आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात ही व्हिस्की अमेरिकेमधून आयात केली जाते.