Dream11 मध्ये कुणाचा पैसा, नव्या कायद्याने कोट्यवधी कमावणारी कंपनीसमोर पर्याय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 21:20 IST2025-08-21T21:18:11+5:302025-08-21T21:20:35+5:30
केंद्र सरकारचे Promotion and Regulation of Online Gaming Bill-2025 विधेयक संसदेत मंजूर झाले. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर मोठं संकट आलं आहे.

केंद्र सरकारच्या प्रस्तावित Promotion and Regulation of Online Gaming Bill -2025 कायद्यामुळे भारतातील ऑनलाईन गेमिंगचे विश्व हादरले आहे. विशेषतः असे गेमिंग प्लॅटफॉर्म जे पैशांवर आधारित आहेत.
या प्लॅटफॉर्मपैकी एक आहे ड्रीम११. ड्रीम ११ चे सीईओ आहेत हर्ष जैन. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यामुळे भारतातील सर्वात लोकप्रिय रिअल मनी मॉडलवर आधारित असलेल्या या कंपनीचे काय होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.
ड्रीम११ ची मालकी स्पोर्टा टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीकडे आहे. १७ वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये ड्रीम११ ची सुरूवात झाली होती. हर्ष जैन आणि भावीत सेठ यांनी कंपनीची सुरूवात केली. हिचे कार्यालय मुंबईत आहे.
या कंपनीचा ७६० मिलियन म्हणजे ६,३८४ कोटी रुपये इतका आहे. तर निव्वळ कमाई २२ मिलियन म्हणजे १८८ कोटी रुपये इतकी आहे. या कंपनीत ८०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
आता मुद्दा आहे की, हा कायदा आल्यानंतर ड्रीम११चे काय होणार? तर नवा कायद्यानुसार असेच गेमिंग प्लॅटफॉर्म चालतील जिथे पैसे द्यावे लागणार नाहीत. म्हणजे पैसे गुंतवावे लागणार नाहीत. मोफत गेम खेळता येतील. त्यामुळे ड्रीम११ लाही असेच मॉडेल स्वीकारावे लागेल. यात ते त्यांच्या यूजर्संचा वापर करून वेगळ्या मार्गाने पैसे कमवू शकतात.