कोण आहेत अंजली पिचाई, कशी झाली सुंदर पिचाईंशी भेट, कुठून घेतलं शिक्षण; काय करतात? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:27 IST2025-02-03T16:02:47+5:302025-02-03T16:27:21+5:30
Google CEO Sundai Pichai Wife : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना संपूर्ण जग ओळखतं. पण त्यांच्या पत्नी अंजली पिचाई यांच्याबद्दल फार कोणाला माहिती नाही

Google CEO Sundai Pichai Wife : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना संपूर्ण जग ओळखतं. पण त्यांच्या पत्नी अंजली पिचाई यांच्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. त्या केवळ सुंदर पिचाई यांच्या पत्नीच नाही, तर त्या एक यशस्वी प्रोफेशनलदेखील आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंजली पिचाई यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला. त्यांनी आयआयटी खडगपूरमधून शिक्षण घेतलंय.
आयआयटी खडगपूरमधून त्यांनी केमिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. आयआयटी खरगपूर ही ती जागा होती जिथे सुंदर पिचाई आणि अंजली यांची पहिली भेट झाली होती.
दोघंही तिथे इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत होते आणि इथूनच त्यांच्या मैत्रीची आणि मग प्रेमाची कहाणी सुरू झाली. "आयआयटी खडगपूर माझ्या हृदयाच्या जवळ आहे, कारण इथंच माझी पत्नी अंजलीची भेट झाली," अशी वक्तव्य सुंदर पिचाई यांनी एकदा केलं होतं.
अंजली टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. सध्या ते इंट्यूट कंपनीत बिझनेस ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करत आहेत. याआधी त्या अॅक्सेंचरमध्ये बिझनेस अॅनालिस्ट होत्या.
सुंदर आणि अंजली पिचाई यांना मुलगी काव्या आणि मुलगा किरण अशी दोन मुलं आहेत. मात्र, दोघंही आपलं कौटुंबिक आयुष्य खासगी ठेवणं पसंत करतात. सुंदर पिचाई यांच्या या प्रवासात अंजली पिचाई यांचा नेहमीच भक्कम आधार राहिला असून त्यांच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे.