२०२३ मध्ये Zomato वर सर्वाधिक डिमांड कशाची?; 'या' फुडसाठी करोडो ऑर्डर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 06:11 PM2023-12-27T18:11:25+5:302023-12-27T18:20:51+5:30

ऑनलाईन शॉपिंगप्रमाणेच ऑनलाईन फूड मागवण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. विशेष म्हणजे महानगरांत, मेट्रो सिटीत ऑनलाईन ऑर्डरद्वारे कोट्यवधींची उलाढाल होत असते.

ऑनलाईन शॉपिंगप्रमाणेच ऑनलाईन फूड मागवण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. विशेष म्हणजे महानगरांत, मेट्रो सिटीत ऑनलाईन ऑर्डरद्वारे कोट्यवधींची उलाढाल होत असते.

झोमॅटो, स्वीगी यांसह अनेक रेस्टॉरंट आणि फूड डिलिव्हरी कंपन्याही या उद्योगात पाय रोवून आहेत. ग्राहकांना हवं तिथे, हवं ते फूड पोहोच करण्याचं काम या कंपन्या करतात.

बसल्या जागेवरुन मोबाईलवरील एपमधून आपणास हवं ते फूड मागवण्याचीही स्पर्धाच सुरू झाली आहे. मात्र, ऑनलाईन फूडमध्ये सर्वात पंसती कोणत्या फूड, किंवा पदार्थाला मिळते.

झोमॅटोने आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडी सर्वांसाठी शेअर केल्या आहेत. तसेच, झोमॅटोवरुन सर्वाधिक मागविण्यात आलेल्या पदार्थ कोणता, हेही त्यांनी सांगितलं आहे.

झोमॅटोने २०२३ मधील ग्राहकांच्या आवडीच्या आणि सर्वाधिक ऑर्डरच्या डिशबद्दलची डिटेल्स शेअर केले आहेत. या वर्षात सर्वाधिक प्रमाणात बिर्याणी फूड मागविण्यात आलं आहे.

झोमॅटो कंपनीला १० कोटी ९ लाख ८० हजार ६१५ ऑर्डर फक्त बिर्याणीच्या आल्या आहेत. झोमॅटोच्या म्हणण्यानुसार या सर्व ऑर्डर्स एका क्रमाने बसवल्यास ही बिर्याणी कुतूबमिनारच्या ८ पट उंच दिसून येईल.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पिझ्झाचा नंबर लागतो. गतवर्षात ७ कोटी ४५ लाख ३० हजार ग्राहकांनी झोमॅटोवरुन पिझ्झाची ऑर्डर दिली आहे.

झोमॅटोवरील या यादीत तिसरा नंबर नुडल्सचा लागतो, ४ कोटी ५५ लाख ५५ हजार ग्राहकांनी ऑनलाईन नुडल्सची ऑर्डर झोमॅटोवरुन केली. ही नुडल्स एकत्रितपणे बांधल्यास पृथ्वीच्या २२ फेऱ्या पूर्ण होतील.

झोमॅटोवरुन ऑर्डर घेण्यात बँगळुरूमधील एका व्यक्तीने सर्वाधिक पैसे खर्च केले आहेत. ४६,२७३ रुपयांची सर्वात मोठी ऑर्डर या व्यक्तीने दिली होती. तर, मुंबईतील एका व्यक्तीने एका दिवसांत १२१ ऑर्डर केल्या होत्या.

झोमॅटोवरुन सर्वाधिक ऑर्डर करणारी व्यक्ती मुंबईची असून त्याने, वर्षभरात ३५८० ऑर्डर केल्या आहेत.