शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जाणून घ्या Term Insurance घेण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 1:23 PM

1 / 15
आजकाल आपल्या धकाधकीच्या जीवन हे अनिश्चिततेनं घेरलेलं आहे. त्याकडेच पाहता अनिश्चिततेचा किंवा गंभीर आजारांचा सामना करणअयासाठी अनेक जण टर्म इन्शुरन्सचा पर्याय निवडतात.
2 / 15
जर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला नक्कीच काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
3 / 15
कोणताही टर्म प्लॅन घेण्यापूर्वी त्यात कव्हर होणारी रक्कम, पॉलिसीचा कालावधी आणि प्रीमिअम अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
4 / 15
टर्म इन्शुरन्स खरेदी करताना तुमची कव्हर होणारी रक्कम ही निश्चित केली पाहिजे. जेणेकरून तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा त्या रकमेनं पूर्ण होतील.
5 / 15
कव्हर होणाऱ्या रकमेची निवड करणं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. एका व्यक्तीला किमान किती रक्कम कव्हर करण्याची गरज आहे हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
6 / 15
परंतु थंब रुल पाहिला तर त्या हिशोबानं नोकरी व्यवसायात असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १० पट रक्कम कव्हर केली पाहिजे.
7 / 15
जर तुमचं उत्पन्न वाढलं तर त्यासोबत ही रक्कमही वाढवली पाहिजे. तुम्ही कव्हर असलेल्या रकमेची गणना ऑनलाइनदेखील करू शकता.
8 / 15
यासाठी अनेक ऑनलाईन टूल्स उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही तुमचं उत्पन्न आणि कामाच्या स्वरूपानुसार रकमेची गणना करू शकता.
9 / 15
टर्म प्लॅनच्या पॉलिसीच्या कालावधीची निवड करणं दुसरं महत्त्वाचं काम आहे. जर कमी वयामध्ये तुम्ही पॉलिसी विकत घेत असाल तर दीर्घ कालावधीसाठी विचार करू शकता.
10 / 15
दीर्घ कालावधीचा विचार केल्यास तुम्हाला पॉलिसी विकत घेताना कमी प्रीमिअमदेखील पडू शकतो.
11 / 15
टर्म पॉलिसी तुम्हाला एजंट अथवा ऑनलाइनही खरेदी करता येऊ शकते.
12 / 15
जर तुम्ही थेट कंपनीची वेबसाईट किंवा अॅग्रीगेटरच्या वेबसाईटच्या माध्यमातून पॉलिसी घेतली तर तुम्हाला प्रीमिअम कमी बसू शकतो. तर एजंटमार्फत घेतल्यास तुम्हाला प्रीमिअम अधिक पडेल.
13 / 15
टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी तुम्ही चांगल्या कंपनीची निवड करताय का हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. कोणत्याही कंपनीची पॉलिसी घेण्यापूर्वी त्यांचा क्लेम रेशो एकदा तपासून पाहा.
14 / 15
तसंच त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचीही माहिती घ्या. याशिवाय कंपनीची सेवा, पैसे भरण्याची पद्धत याचीही माहिती करुन घ्या.
15 / 15
जर एखादा अपघात झाला तर संबंधित व्यक्तीला अपंगत्व आलं किंवा अन्य कोणताही त्रास सहन करावा लागला तर अशा परिस्थितीत आर्थिक सुरक्षेसाठी रायडरदेखील घेणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रीमिअम द्यावा लागतो.
टॅग्स :businessव्यवसायMONEYपैसाInvestmentगुंतवणूकIndiaभारत