आता WhatsApp वरून बुक करता येणार Uber कॅब; पाहा कशी असेल प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 11:44 AM2021-12-03T11:44:19+5:302021-12-03T11:57:08+5:30

कंपनीनं गुरूवारी यांसंदर्भातील केली घोषणा. पाहा कशी बुक करता येणार कॅब.

जर तुम्ही कॅबनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता भारतात उबर ग्राहक (Uber Customers) WhatsApp च्या मदतीनं कॅब बुक करू शकणार आहेत. कंपनीनं २ डिसेंबर रोजी यासंदर्भातील घोषणा केली आहे. मेटाच्या (Meta) म्हणजेच फेसबुकच्या लोकप्रिय मेसेजिंक अॅप व्हॉट्सअॅपसोबत कंपनीचं इंटिग्रेशन जागतिक स्तरावर होईल, असं उबरनं सांगितलं.

उबर आणि व्हॉट्सअॅपनं भारतात भागीदारीची घोषणा केली. यानंतर ग्राहकांना उबरच्या अधिकृत चॅटबॉटच्या माध्यमातून राइड बुक करता येणार आहे. हे राइड्सना वॉट्सअॅप मेसेज पाठवण्यासारखं सोपं आहे, अशी प्रतिक्रिया उबरकडून देण्यात आली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात ही सेवा केवळ लखनौमध्ये सुरू केली जाणार आहे. त्यानंतर हळहळू अन्य शहरांमध्ये याचा विस्तार करण्यात येईल असं कंपनीनं सांगितलं.

या इंटिग्रेशनमुळे रायडर्सना आता उबर अॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. युझर रजिस्ट्रेशन, राइड बुकिंग आणि प्रवासाची रसिट सर्वकाही व्हॉट्सअॅपद्वारे देण्यात येणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं.

जर तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर करत असाल तर तुम्ही तीन प्रकारे राइड बुक करू शकता. उबरच्या बिझनेसच्या अकाऊंटवर मेसेड रून, एक क्युआर कोड स्कॅन करत किंवा उबर चॅट उघडण्याच्या लिंकवर क्लिक करा. असं केल्यानंतर तुम्हाला पिक अप आणि ड्रॉप लोकेशन टाकण्यास सांगितलं जाईल. तसंच प्रवास भाड्याची माहिती पहिलेच देण्यात येईल, तसंच अपेक्षित वेळ आणि ड्रायव्हरचं लोकेशनही समजेल.

Whatsapp चा वापर करणाऱ्या रायडर्सना सेफ्टी फीचर्स आणि इन्शुरन्स प्रोटेक्शन मिळणार आहेत. बुकिंगदरम्यान ड्रायव्हरचं नाव आणि नंबर प्लेटची माहिती मिळेत. तसंच ड्रायव्हरचं लोकेशनही ट्रॅक करण्यात सक्षम असणार आहे.

Whatsapp चॅच फ्लो रायडरला सेफ्टी गाईडलाईन्सबाबत माहिती देतं. तसंच आपात्कालिन परिस्थितीत उबरपर्यंत कसं पोहोचणार याची माहितीदेखील देण्यात येते. जर प्रवासागदरम्यान त्यांनी इमर्जन्सी ऑप्शन सिलेक्ट केल्यास त्यांना कस्टमर केअरवरून फोन केला जाईल.

तुर्तास Whatsapp द्वारे उबर राईड बुक केल्यास केवळ इंग्रजीचा पर्याय उपलब्ध असेल. तसंच अन्य भाषांमध्ये लवकरच या सेवांचा विस्तार केला जाणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं.

राईड बुक करण्यासाठी उबरच्या बिझनेस अकाऊंटवरून मेसेज करत क्युआर कोड स्कॅन करून चॅट सुरू करण्यासाठी लिंकवर क्लिक करून Whatsapp वर चॅटबॉट उघडा. त्यावर Hi असं लिहून पाठवा.

त्यानंतर जनरेट करण्यात आलेला ओटीपी टाका. तसंच त्यानंतर पिकअप पत्ता आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुम्ही लोकेशन शएअर करता. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंय त्याचा पत्ता टाका.

Uber Go, Uber Auto, Uber Moto यापैकी तुमच्या आवडीची राइड निवडा. तसंच यानंतर तुम्हाला ड्रायव्हरच्या नावासोबतच रायडरची पूर्ण माहिती संबंधित व्यक्तीला पाठवण्यात येईल.

Read in English