तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:24 IST2025-10-03T13:05:20+5:302025-10-03T13:24:12+5:30

VIPs Exempted From Toll Tax : जर तुम्ही राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करत असाल तर तुम्ही टोल प्लाझावर पैसे भरता. पण तुम्हाला माहिती आहे का की देशात असे काही खास लोक आहेत ज्यांना टोल टॅक्स भरावा लागत नाही.

राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना सर्वसामान्यांना टोल टॅक्स भरावा लागतो. मात्र, देशात काही विशिष्ट लोक आहेत, ज्यांच्या वाहनांना कायद्यानुसार यातून पूर्ण सूट दिली जाते.

भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान हे या यादीत सर्वात वर आहेत. त्यांच्या ताफ्यातील वाहनांना देशातील कोणत्याही टोल नाक्यावर थांबवले जात नाही.

राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनाही टोल टॅक्समध्ये सूट मिळते. मात्र, ही सूट त्यांना त्यांच्या संबंधित राज्याच्या हद्दीत सरकारी कामावर असताना लागू होते.

भारताचे मुख्य न्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनाही टोल माफ असतो. तसेच लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा अध्यक्षांच्या वाहनांनाही टोल लागत नाही.

गणवेशात आणि कर्तव्यावर असलेले संरक्षण तसेच पोलीस अधिकारी यांना टोल टॅक्स भरण्याची गरज नसते. ही सूट त्यांच्या सरकारी कामाच्या वेळेस लागू होते.

रस्ते परिवहन मंत्रालयाचे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी जेव्हा तपासणीच्या कामावर बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्या वाहनांनाही ही सूट मिळते.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाही टोलमधून सूट आहे. यात ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि शव वाहन यांचा समावेश होतो. तसेच, विदेशी राजनैतिक पाहुण्यांनाही सूट मिळते.

या सर्व वाहनांना टोल नाक्यावर थांबवले जात नाही. कारण त्यांच्या वाहनांवर विशेष प्रकारचे स्टिकर्स लावलेले असतात. हे स्टिकर्स कॅमेऱ्यात दिसताच टोल गेट त्वरित उघडले जाते.