शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' 12 गोष्टी करा, 100 टक्के श्रीमंत व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 1:43 PM

1 / 12
आपल्या मासिक उत्पन्नापैकी जास्तीत जास्त 30 टक्के रक्कमच घरखर्चासाठी वापरली जाईल, याची काळजी घ्या. 30 टक्के रकमेतून ईएमआय आणि इतर देणी द्या. 30 टक्के रक्कम भविष्य नियोजनासाठी बचत करून ठेवा आणि 10 टक्के रक्कम मनोरंजन, भटंकतीसाठी वापरा.
2 / 12
गुंतवणूक म्हणून 'सेकंड होम'चा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. तेही कर्ज काढून हे दुसरं घर घेणार असाल, तर त्या फंदात न पडलेलंच बरं. कारण, त्यावर जाणाऱ्या व्याजाचा विचार केल्यास, ते तुम्हाला फारसा फायदा मिळवून देत नाही, असंच सर्वेक्षणातून समोर आलंय.
3 / 12
जितक्या लवकर एसआयपी (सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन) सुरू करता येईल, तेवढे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल.
4 / 12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला घाबरू नका. या गुंतवणुकीतील नफा-तोटा शेअर बाजारातील चढ-उतारांवर ठरतो, हे खरं असलं तरी सुरक्षित फंडाची निवड केल्यास काळजीचं कारण नाही. गेल्या काही काळातील फंडाची कामगिरी, त्याने दिलेला परतावा पाहूनच फंड निवडावा.
5 / 12
चलन फुगवटा किंवा महागाईच्या काळात बचत खात्यात पैसे ठेवून देणं अगदीच चुकीचं आहे. एक ठरावीक रक्कम या खात्यात जरूर असावी, पण तिथे पैसे साठवण्यापेक्षा ते गुंतवणंच अधिक हिताचं.
6 / 12
इन्शुरन्स जरूर असावा. पण, चांगला परतावा मिळवण्याचा तो मार्ग नाही. इन्शुरन्समधील गुंतवणूक हे एक प्रकारचे 'जोखीम व्यवस्थापन' असते.
7 / 12
शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल, तर त्याकडे बारीक लक्ष असू द्या.
8 / 12
आलिशान घर आणि कार असली की आपण श्रीमंत असतो, हा चुकीचा समज आहे. त्यापेक्षा तुम्ही किती पैसे वाचवता आणि कुठे गुंतवता, यावर तुमची श्रीमंती ठरणार असते.
9 / 12
भविष्याचं नियोजन योग्य पद्धतीने करा. ऐन वेळी येऊ शकणाऱ्या खर्चांसाठी एक भाग वेगळा काढून ठेवा.
10 / 12
आरोग्यासाठी खर्च करताना मागे-पुढे पाहू नका. वेळच्या वेळी आवश्यक आरोग्य तपासण्या करा. ही एकप्रकारे गुंतवणूकच आहे. कारण, 'जान है तो जहाँ है'
11 / 12
वयाच्या 45 व्या वर्षी सर्व देणी, कर्जातून मोकळे व्हा. कारण, मुलांचे उच्चशिक्षण, लग्न या काळातच येते. त्याचे नियोजन तिशीपासूनच व्हायला हवे.
12 / 12
क्रेडिट कार्डाचा वापर जपून करा. चैनीच्या वस्तूंऐवजी, गरजेच्या वस्तू क्रेडिट कार्डवर खरेदी करा.
टॅग्स :MONEYपैसाInvestmentगुंतवणूक