याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 19:26 IST2025-10-02T19:13:30+5:302025-10-02T19:26:14+5:30

गेल्या पाच वर्षांत त्याने १३,६३५% परतावा दिला आहे. पाच वर्षांत, स्टॉक ₹१ वरून त्याची सध्याची किंमत ₹१८४.०५ पर्यंत पोहोचला आहे.

शेअर बाजारात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करणारी स्मॉल-कॅप मल्टी-बॅगर कंपनी एलीटकॉन इंटरनॅशनल, शुक्रवारी फोकसमध्ये राहण्याची शक्यता आहे. एफएमसीजी व्यवसायाला बळकटी देण्यासाठी, कंपनीने दोन प्रमुख कृषी-आधारित कंपन्यांमधील नियंत्रणात्मक भागभांडवलाच्या खरेदीची घोषणा करत, लँडस्मिल अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड आणि सनब्रिज अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडमधील भागभांडवल खरेदी करत मोठा विस्तार करण्याचे संकेत दिले आहेत.

लँडस्मिल अ‍ॅग्रोमध्ये अधिग्रहण : एलिटसमिल इंटरनॅशनलने ५१,४८,००० इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. जे ५५% हिस्सेदारी दर्शवतात. हा करार प्रति शेअर ₹१०२.६७ या दराने झाला. एकूण रोख रक्कम ₹५२.८५ कोटी एवढी होती. लँडस्मिल अ‍ॅग्रो, कृषी उत्पादने आणि संबंधित व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

कंपनीची स्थापना ३ ऑक्टोबर २०१९ रोजी झाली असून, तिचे पेड-अप शेअर भांडवल ₹९.३६ कोटी एवढे आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीने ₹१,३९,४८०.०५ लाख (₹१,३९४.८ कोटींहून अधिक) उलाढाल नोंदवली.

या कराराद्वारे, एलिटकॉन इंटरनॅशनलने तिच्या विद्यमान एफएमसीजी पोर्टफोलिओला बळकटी देण्याचे, त्यांच्या ऑपरेशनल स्केलचा विस्तार करण्याचे आणि महसूल स्रोतांमध्ये विविधता आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सनब्रिज अ‍ॅग्रोमध्ये अधिग्रहण - एलिटकॉन इंटरनॅशनलने या कंपनीत ९८,७७,१३८ इक्विटी शेअर्स विकत घेतले, जे ५१.६५% हिस्सा दर्शवितात. हा करार प्रति शेअर ₹१३० या दराने झाला आणि एकूण रोख रक्कम ₹१२८.४० कोटी होती. सनब्रिज अ‍ॅग्रो कृषी उत्पादने आणि संबंधित व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

कंपनीची स्थापना ७ फेब्रुवारी २०२२ रोजी झाली आणि तिचे पेड-अप शेअर भांडवल ₹१९.१२ कोटी आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तिची उलाढाल ₹१,४४,३०४.३२ लाख (₹१,४४३ कोटींहून अधिक) होती. या अधिग्रहणामुळे एलिटकॉन इंटरनॅशनलला त्यांचे उत्पादन पोर्टफोलिओ अधिक वाढेल.

अशी आहे कंपनीच्या शेअरची स्थिती - एलिटकॉन इंटरनॅशनलचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थाने मल्टीबॅगर ठरला आहे, गेल्या पाच वर्षांत त्याने १३,६३५% परतावा दिला आहे. पाच वर्षांत, स्टॉक ₹१ वरून त्याची सध्याची किंमत ₹१८४.०५ पर्यंत पोहोचला आहे.

एका वर्षाचा विचार करता, या शेअरने केवळ एकाच वर्षात ५,६८७% परतावा दिला आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून (YTD) तो १,६७४% ने वाढला आहे. स्टॉकची शेवटची ट्रेडेड किंमत ₹१८४.०५ होती.

हा शेअर अजूनही त्याच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹४२२.६५ (ऑगस्ट २०२५) पासून जवळजवळ ५८% ने खाली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याचा ५२ आठवड्यांचा नीचांक ₹३.१२ वर नोंदवला गेला होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)