याला म्हणतात परतावा...! अचानक 6000 रुपयांनी वधारला शेअर, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 22:06 IST2025-01-28T22:00:04+5:302025-01-28T22:06:07+5:30
यापूर्वी गेल्या सोमवारी हा शेअर 127778.25 रुपयांवर बंद झाला होता. अर्थात आज एकाच दिवसात हा शेअर 6,388.9 रुपयांनी वधारला आहे...

एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअरला आज 5% चे अप्पर सर्किट लागले आणि कंपनीचा शेअर 134167.15 रुपयांच्या इंट्रा हायवर पोहोचला. यापूर्वी गेल्या सोमवारी हा शेअर 127778.25 रुपयांवर बंद झाला होता. अर्थात आज एकाच दिवसात हा शेअर 6,388.9 रुपयांनी वधारला आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून या शेअरमध्ये सातत्याने घट दिसून येत होती. या काळात गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या कंपनीच्या शेअर्सची किंमत जाणून घेण्यासाठी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी एक विशेष कॉल लिलाव आयोजित करण्यात आला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी, २९ ऑक्टोबर रोजी, या स्टॉकने अचानक २,३६,२५० रुपयांचा टप्पा ओलांडला.
महत्वाचे म्हणजे, जून २०२४ मध्ये या शेअरची किंमत केवळ ३ रुपये होती. आज शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्स १२०० अंकांनी वधारला होता.
गेल्या २८ ऑक्टोबरनंतर या स्टॉकमध्ये सातत्याने ५% चे अप्पर सर्किट होते. या शेअरने सुमारे दोन आठवड्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. ८ नोव्हेंबर रोजी कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ३३२,३९९.९५ रुपयांवर पोहोचले होते.
तथापि, ही तेजी फार काळ टिकली नाही आणि शेअरमध्ये नफा वसुली दिसून आली. हा स्टॉक त्याच्या लाइफटाइम उच्चांकापासून सध्याच्या किमतीपर्यंत ६०% पेक्षा अधिक घसरला आहे.
कंपनीचा कारभार - एल्सिड इन्व्हेस्टमेंट्स ही भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत (RBI) रजिस्टर्ड एक गैर-बैंकिंग वित्तीय कंपनी (NBFC) म्हणून काम करते. सध्या कंपनीचा कुठलाही ऑपरेटिंग व्यवसाय नाही. मात्र, एशियन पेंट्स इत्यादीसारख्या इतर मोठ्या कंपन्यांमध्ये लक्षणीय गुंतवणूक आहे. उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे त्याच्या होल्डिंग कंपन्यांकडून मिळणारा लाभांश. या कंपनीचे मार्केट कॅप 2,649 कोटी रुपये एवढे आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)