याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:23 IST2025-09-20T18:15:10+5:302025-09-20T18:23:59+5:30

या कंपनीच्या शेअरने गेल्या दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 900 टक्क्यांचा परतावा देत मालामाल केले आहे.

शेअर बाजारात कधी कोणता शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करेल, कुणीच सांगू शकत नाही. सध्या असाच एका कंपनीचा शेअर आपल्या गुंतवणूकद जबरदस्त परतावा देत आहे. या कंपनीच्या शेअरने गेल्या दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 900 टक्क्यांचा परतावा देत मालामाल केले आहे. यामुळे हा शेअर 'मल्टीबॅगर' ठरला आहे.

हा शेअर आहे व्हिवियाना पॉवर टेक लिमिटेड कंपनीचा. महत्वाचे म्हणजे, शुक्रवारीही (19 सप्टेंबर) या शेअरमध्ये जवळपास 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. आता या शेअरचा भाव बीएसईवर 1458.85 रुपयांवर पोहोचला आहे.

दिला जबरदस्त परवाता - खरेतर, कधीकाळी हा शेअर केवळ ₹145 वर मिळत होता. आता हा शेअर थेट ₹1,450 पेक्षाही वर पोहोचला आहे. या शेअरने 2023 मध्येच आपल्या गुंतवणूकदारांना 96% चा परतावा दिला. तसेच वार्षिक आधाराचा विचार करता या शेअरने 2024 मध्ये तब्बल 485% चा परतावा दिल आहे. तर चालू आर्थिक वर्षात या शेअरने आतापर्यंत 40% ची तेजी नोंदवली आहे.

कंपनीला मध्य-गुजरात विज कंपनी लिमिटेडकडून तब्बल ₹265 कोटींची वर्क ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला हीऑर्डर पुढील सोळा महिन्यांत पूर्ण करायची आहे. यामुळे बाजारात या शेअरसंदर्भात उत्साह दिसत आहे.

दरम्यान, कंपनीने ऑगस्ट 2025 मध्ये शेयर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले होते की, आपल्याकडे ₹1,000 कोटींहून अधिकच्या वर्क ऑर्डर्स आहेत. तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप ₹923 कोटी रुपये होते.

याच बरोबर, कंपनीला गुजरात एनर्जी ट्रान्समिशनकडून ₹55.36 कोटी आणि पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशनकडून ₹59 कोटींची वर्क ऑर्डर मिळाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, पुढील काळात हा शेअर आणखी वधारण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)