याला म्हणतात धमाका स्टॉक...! 4 वर्षात ₹1 लाखाचे केले ₹89 लाख, 3 वेळा बोनस शेअर देऊन लोकांना केलंय मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 18:51 IST2024-12-19T18:44:20+5:302024-12-19T18:51:45+5:30
कंपनीने हा पराक्रम केला आहे तो बोनस शेअर्सच्या जोरावर...

लॅन्सर कंटेनर लाइन्सच्या समभागांनी अवघ्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या समभागांनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर केवळ 4 वर्षांत 4 रुपयांवरून 40 रुपयांपर्यंत वाढला आहे.
या कालावधीत लान्सर कंटेनर लाइन्सचा शेअर 1 लाख रुपयांवरून 89 लाख रुपयांपर्यंत वाढला आहेत. कंपनीने हा पराक्रम केला आहे तो बोनस शेअर्सच्या जोरावर. 2018 पासून आतापर्यंत कंपनीने आपल्या भागधारकांना तीन वेळा बोनस शेअर्सचे गिफ्ट दिले आहे.
1 लाखाचे केले 89 लाख रुपयांहून अधिक - लॅन्सर कंटेनर लाइन्सचा शेअर 18 डिसेंबर 2020 रोजी 4.07 रुपयांवर होते. जर एखाद्या व्यक्तीने 18 डिसेंबर 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला 24,570 शेअर्स मिळाले असते.
लॅन्सर कंटेनर लाइन्सने 2020 पासून दोन वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. यानंतर, सप्टेंबर 2023 मध्ये 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरित केले.
अर्थात, कंपनीने दोन्ही वेळा प्रत्येक 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स दिले आहेत. जर हे बोनस शेअर्स जोडले गेले तर, 1 लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सची एकूण संख्या 221,130 शेअर्सपर्यंत पोहोचते.
लॅन्सर कंटेनर लाइन्सचा शेअर 19 डिसेंबर 2024 रोजी 40.50 रुपयांवर व्यवहार करत आहेत. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार, लॅन्सर कंटेनर लाइन्सच्या 221,130 शेअर्सचे मूल्य 89.55 लाख रुपये एवढे होते.
यापूर्वी कंपनीने जानेवारी 2018 मध्येही आपल्या गुंतवणूकदारांना 3:5 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. अर्थात, कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 5 शेअर्समागे 3 बोनस शेअर्स वितरित केले आहेत. मात्र, आम्ही आमच्या कॅलक्युलेशन्समध्ये वर्ष 2020 नंतर, देण्यात आलेल्या बोनस शेअर्सचाच समावेश केला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)