अर्थसंकल्पाआधीच 'या' वस्तू झाल्या स्वस्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 18:51 IST2018-01-19T18:40:12+5:302018-01-19T18:51:13+5:30

जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत कर कमी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले आहेत. जीएसटी परिषदेच्या बैठकीत 53 सेवांच्या दरात कपात केली आहे.

पिण्याच्या पाण्याच्या 20 लिटरच्या बॉटलवरचाही जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर आणला आहे.

मोठ्या आणि मध्यम आकाराच्या सेकंड हँड कार तथा एसयूव्हीवर लावण्यात आलेला 28 टक्के जीएसटी आता 18 टक्क्यांवर नेण्यात आला आहे.

एलपीजी गॅसवरचा जीएसटीसुद्धा 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आला आहे.

सिंचन उपकरणांवरचाही 18 टक्क्यांवरचा जीएसटी दर 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

बायो डिझेलवरचा जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

साखरेचे पदार्थ आणि बिस्किटांवरचा जीएसटीही 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत आला आहे.

28 हातमाग वस्तूंवरचा जीएसटी दर शून्य टक्क्यांवर नेला आहे.

मखमली फॅब्रिकवरचा जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर नेला आहे.

टॅग्स :जीएसटीGST