Mukesh Ambani: पाच पुस्तके, ज्यांनी मुकेश अंबानींना आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनविले, 2022-30 ची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 03:27 PM2021-12-18T15:27:29+5:302021-12-18T15:33:54+5:30

Mukesh Ambani read these five books for success: अंबानींना 2021 मध्ये यशस्वी बनविण्यामागे पाच पुस्तकांचेही योगदान आहे. खुद्द मुकेश अंबानी यांनीच या पुस्तकांची नावे सांगितली आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील 12 वे श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलियेनियर इंडेक्सनुसार त्यांची संपत्ती ही 87.1 अब्ज डॉलर एवढी आहे. गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत 10.4 अब्ज रुपयांची वाढ झाली आहे. अंबानींना 2021 मध्ये यशस्वी बनविण्यामागे पाच पुस्तकांचेही योगदान आहे.

खुद्द मुकेश अंबानी यांनीच या पुस्तकांची नावे सांगितली आहेत. ब्लूमबर्ग न्यू इकोनॉमीने अंबानी यांना तुम्हाला कोणच्या पुस्तकांपासून प्रेरणा मिळते असे विचारले असता मुकेश अंबानी यांनी या पाच पुस्तकांबद्दल सांगितले. चला जाणून घेऊया कोणती आहेत ती पुस्तके....

कोणत्याही माणसाला मग तो गरीब असो की श्रीमंत काही ना काही प्रेरणा घेतली तरच त्याची प्रगती होते. अगदी गर्भश्रीमंत असलेल्या उद्योगपतींनादेखील त्यांचे व्यवसाय, त्यांची श्रीमंती टिकवून ठेवायची असेल तर असे नवनवीन विचार, प्रयोग करत रहावेच लागतात. मुकेश अंबानींनाही या पाच पुस्तकांनी एवढ्या मोठ्या कंपन्यांचा डोलारा सांभाळण्यासाठी प्रेरणा, दिशा दाखविली असणारच. त्याशिवाय त्यांनी ही नावे घेतली नसतील हे निश्चित.

'टेन लेसन्स फॉर ए पोस्ट पॅनडेमिक वर्ल्ड' - या पुस्तकाचे लेखक फरीद जाकरिया आहेत. मुकेश अंबानींनुसार फरीद यांनी या पुस्तकात कोरोना महामारी आणि नजिकच्या काळातील काही विनाशकारी घटनांवर हे पुस्तक लिहिले आहे. या घटनांमध्ये त्यांनी काही समानता दाखविल्या आहेत. यामध्ये जागतिक संकटे ही नेहमी अस्थिर जीवनशैलीच्या प्रथा आणि कमजोर शासर संरचनांतून उत्पन्न होतात.

ही संकटे तातडीने दूर करण्यासाठी कुशल नेतृत्व, जीवनशैलीमध्ये परिवर्तन आणि प्रभावी आंतरराष्ट्रीय सहकार्य यांद्वारेच केले जाऊ शकते. या पुस्तकातील एक गोष्ट जी अंबानींच्या मनावर परिणाम करणारी ठरली ती म्हणजे, प्रकोप अपरिहार्य आहे मात्र, महामारी ही पर्यायी आहे.

प्रिंसिपल्स फॉर डीलिंग विद द चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर: व्हाई नेशंस सक्सीड एंड फेल - हे पुस्तक डेलियो यांनी लिहिले आहे. अंबानींनुसार हे एक चांगले पुस्तक आहे, जे 500 वर्षांपेक्षा अधिकच्या इतिहासातील प्रमुख देशांचे यश आणि अपयश सांगते. आपण आता जे अनुभवत आहोत त्यापेक्षा येणारा काळ आमूलाग्र का वेगळा असेल हे समजून घेण्यात हे आपल्याला मदत करते. हे पुस्तक धोरणकर्ते, उद्योजक, अधिकारी आणि मुख्य म्हणजे तरुणांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे.

द रेजिंग 2020: कंपनीज, कंट्रीज, पीपुल अँड द फाइट फॉर अवर फ्यूचर - हे पुस्तक एलेक रॉस यांनी लिहिले आहे. अनेक दशकांपासून आधुनिक सभ्यता टिकवून ठेवणारा सामाजिक करार, सरकार, व्यवसाय आणि लोक यांच्यात न बोललेले करार, डिजिटल युगात मूलभूत बदल कसा होत आहे, याचे सखोल परीक्षण हे पुस्तक करते.

अंबानींच्या म्हणण्यानुसार, पुस्तकात आपल्या काळातील काही महान विचारवंत, राजकीय आणि आर्थिक व्यक्तींच्या मुलाखती आहेत, ज्यांनी या बदलात योगदान दिले आहे. आपल्या सभ्यतेसाठी पुढे काय आहे यावरही त्यांनी आपली मते मांडली आहेत.

2030: हाउ टूडेज बिगेस्ट ट्रेंड्स विल कोलाइड अँड रिशेप द फ्यूचर ऑफ एवरीथिंग - या पुस्तकाचे लेखक मौरो गुइलेन आहेत. हे पुस्तक 2030 मधील जगाच्या स्थितीबद्दल, विशेषतः लोकसंख्याशास्त्रातील संभाव्य बदल आणि जागतिक आर्थिक संभावनांवर होणार्‍या परिणामांबद्दल अंतर्दृष्टीपूर्ण अंदाजांनी भरलेले आहे. हे शहरीकरण, तंत्रज्ञान, गिग इकॉनॉमी आणि ऑटोमेशनमधील ट्रेंड देखील एक्सप्लोर करते जे कोविड नंतरच्या जगाला आकार देण्यास बांधील आहेत.

बिग लिटिल ब्रेकथ्रोज: हाउ स्मॉल, एव्हरीडे, इनोव्हेशंस ड्राइव ओवरसाइज्ड रिझल्ट्स - हे पुस्तक जोश लिंकर यांनी लिहिले आहे. हे उद्योजकांसाठी आवश्यक आहे. अंबानींच्या म्हणण्यानुसार, तुमच्या लक्षात येईल की लहान सर्जनशील कृती व्यवसायात मोठ्या प्रमाणात बक्षिसे देतात. आणि दैनंदिन सूक्ष्म नवकल्पनांद्वारे, व्यक्ती आणि संस्था कठीण आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतात. तसेच कोविड नंतरच्या जगात परिवर्तनाच्या संधींचा फायदा घेऊ शकतात.