... तर 1 लाखाचे होतील 22 हजार; पैशांची बचतच नव्हे, गुंतवणूकही आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 01:28 PM2023-04-25T13:28:12+5:302023-04-25T13:41:27+5:30

बचत करण्याची सवय जितकी चांगली आहे, तितकीच आवश्यकता आहे ही रक्कम गुंतविण्याची. गुंतवणूक केल्यास रक्कम दरवर्षी वाढत जाते.

बचत करण्याची सवय जितकी चांगली आहे, तितकीच आवश्यकता आहे ही रक्कम गुंतविण्याची. गुंतवणूक केल्यास रक्कम दरवर्षी वाढत जाते.

मात्र, घरातच ठेवलेल्या पैशांची किंमत कमी होत जाते. पैशाचे मूल्य कमी होऊ नये, यासाठी आवश्यक गोष्टींची आज आपण चर्चा करू या.

६ टक्के परताव्याचे हवे नियोजन - वाढत्या महागाईमुळे पैशांची किंमत कमी होत जाते. सरासरी ६% दराने महागाई वाढल्यास १ लाख रुपयांची किंमत २५ वर्षांत २२ हजार रुपये राहील.

१ लाखाचे मूल्य टिकविण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीवर किमान ६ टक्के दराने परतावा तुम्हाला मिळायला हवा.

एसआयपीने तुम्ही होऊ शकता कोट्यधीश -दरमहा ५ हजार रुपये ‘सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’मध्ये (एसआयपी) गुंतविल्यास वार्षिक १३% परताव्याच्या हिशेबाने २५ वर्षांत कोट्यधीश होऊ शकता. जास्त पैसे गुंतविल्यास लवकरच कोट्यधीश व्हाल.

गरज पडली तरच काढा पैसे - बाजारात चढ-उतार झाले तरी अजिबात पैसे काढू नका. इक्विटी गुंतवणूक साधारण ३ वर्षांत चांगला परतावा देते.

त्यामुळे किमान ३ वर्षे गुंतवणूक राहील, हे पाहणे आवश्यक आहे. अत्यंतिक गरज असेल, तेव्हाच हे पैसे काढा.

‘ईएलएसएस’मध्ये कर सवलत -‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’मधील (ईएलएसएस) गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम ८०सी अन्वये ४६,८०० रुपयांपर्यंत कपातीचा लाभ मिळतो. एक वर्षात १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.

निगेटिव्ह परताव्यापासून सावध राहा - महागाईपेक्षा कमी परतावा मिळाल्यास त्यास नकारात्मक परतावा (निगेटिव्ह रिटर्न) म्हणतात. नकारात्मक परताव्यापासून वाचण्यासाठी किमान ६ टक्के परतावा मिळेल, अशाच ठिकाणी गुंतवणूक करा.