Rakesh Jhunjhunwala Share Market : ‘या’ दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, झुनझुनवाला यांना झालं ५४० कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 02:38 PM2022-05-30T14:38:51+5:302022-05-30T14:46:01+5:30

Rakesh Jhunjhunwala Share Market : दोन शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेरश झुनझुनवाला यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे.

Rakesh Jhunjhunwala Share Market : मध्यंतरी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत होती. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. त्यामुळे शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवालाही (Rakesh Jhunjhunwala) हेदेखील याच्यापासून दूर नाहीत.

त्यांनादेखील मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. त्यांची गुंतवणूक असलेल्या दोन शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानं महिनाभरात त्यांना 540 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

स्टार हेल्थ इन्शुरन्स (Star Health and Insurance) आणि मेट्रो ब्रँड्स (Metro Brands) च्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या महिन्याभरात मोठी घसरण दिसून आली आहे. मेट्रो ब्रँड्सचे शेअर 562 रुपयांवरून घसरून 523 रुपयांवर आला आहे.

तर दुसरीकडे स्टार हेल्थच्या शेअरची किंमत ७०० रुपयांवरून घसरून 663 रुपये प्रति शेअरवर आली आहे. दोन्ही शेअर्सच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांना तब्बल 540 कोटी रूपयांचं नुकसान सोसावं लागलं आहे.

राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थचे एकूण 10,07,53,935 शेअर्स अथवा 17.50 टक्के स्टॉक्स आहेत. तर झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँड्सचे 39,153,600 शेअर्स अथवा 14.40 टक्के हिस्सा आहे.

झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थ कंपनीचे 10,07,53,935 शेअर्स आहेत. गेल्या एका महिन्यादरम्यान यात 35.55 रुपये प्रति शेअरची घसरण झाली. याचा अर्थ 38.55*10,07,53,935 नुसार त्यांना 388 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागलं आहे.

याचप्रमाणे त्यांच्याकडे मेट्रो ब्राँड्सचेही शेअर्स आहेत. त्यात गेल्या महिन्याभराच्या कालावधीत 39.05 रुपये प्रति शेअरची घसरण झाली. यानुसार 39,153,600*39.05 नुसार त्यांना 152 कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे.