जबरदस्त! TATA समुह चीनला देणार टक्कर, आता भारतात बनणार iPhone, आख्खा प्लांटच विकत घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 03:37 PM2023-07-11T15:37:44+5:302023-07-11T15:51:41+5:30

TATA : टाटा समुह लवकरच भारतात iPhone बनवणार आहे. या संदर्भाच अॅपल कंपनीसोबत करार सुरू आहे.

TATA : टाटा समुह आता लवकरच मोबाईल फोन बनवण्याच्या व्यवसायात प्रवेश करणार आहे. टाटा आता लवकरच iPhone बनवण्याचे काम सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे.

TATA : टाटा समुहाची या संदर्भात अॅपल सप्लायर विस्ट्रॉन कॉर्प सोबत करार सुरू आहे. लवकरच ही डील पूर्ण होईल, या करारानंतर टाटा आयफोन आपल्या देशातच बनवणार आहे.

iPhone बनवणाऱ्या विस्ट्रॉन या कंपनीचा प्लांट कर्नाटकात आहे. ही डील झाल्यानंतर टाटा कर्नाटकातील प्लांट टेकओव्हर करु शकतो.

TATA : टाटा समुहाच्या या निर्णयामुळे चीनला मोठा झटका बसणार आहे.

तैवानची विस्ट्रॉन कंपनी करारावर इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवते. अलीकडेच, कंपनीने कर्नाटक प्लांटमधून यावर्षी १.८ अब्ज डॉलर किमतीचे आयफोन बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

TATA : सरकारी प्रोत्साहन मिळावे म्हणून कंपनीला हे करायचे आहे. कंपनी पुढील वर्षापर्यंत तिप्पट कर्मचारी वाढवण्यावरही भर देत आहे.

विस्ट्रॉनला भारतातील आयफोन उत्पादनातून बाहेर पडायचे आहे. त्यानंतर आता टाटाने ही कंपनी खरेदी करण्यात रस दाखवला आहे. मात्र, टाटा, विस्ट्रॉन आणि अॅपलने याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे.

TATA : मिळालेल्या माहितीनुसार, टाटा आणि विस्ट्रॉन यांच्यात चर्चा सुरू आहे. ते ऑगस्टमध्ये डील फायनल करू शकतात. टाटाचा हा करार झाला तर टाटा भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनेल. यासोबतच मेड इन इंडिया iPhones लवकरच बाजारात दिसणार आहेत.

सरकार विदेशी कंपन्यांना त्यांचे उत्पादन आणि कामगार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कोरोनापासून पुरवठा समस्या आणि अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव यामुळे परदेशी कंपन्या चीनवर अधिक अवलंबून आहेत.

आता विदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. टाटा समूहाने अलीकडेच इलेक्ट्रॉनिक उत्पादनात प्रवेश केला आहे. कंपनीच्या तामिळनाडूतील कारखान्यात आयफोनची चेसिस म्हणजेच उपकरणाचा मेटल बॅकबोन तयार केला जातो.