जबरदस्त...! 7 रुपयांच्या शेअरनं दिला 5500 टक्क्यांचा परतावा, 1 लाखाचे झाले 56 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 04:16 PM2023-02-15T16:16:38+5:302023-02-15T16:21:23+5:30

संरक्षण क्षेत्रातील या कंपनीने गोल्या काही दिवसांत जबरदस्त परतावा देत गुंतवणूकदारांचे नशीबच बदलून टाकले आहे.

जर आपण शेअर बाजारात एखाद्या कंपनीचे फंडामेंटल पाहून गुंतवणूक केली, तर वेळेनुसार अधिक परतावा मिळण्याची शक्यता वाढते. निबे (Nibe Share) ही अशाच कंपन्यांपैकी एक आहे. संरक्षण क्षेत्रातील या कंपनीने गोल्या काही दिवसांत जबरदस्त परतावा देत गुंतवणूकदारांचे नशीबच बदलून टाकले आहे.

गेल्या 3 वर्षांसंदर्भात बोलायचे झाल्यास, कंपनीच्या शेअर्समध्ये 3159 टक्के एवढी तेजी दिसून आली आहे. या दरम्यान कंपनीच्या एका शेअरचा भाव 12 रुपयांवरून 391 रुपयांवर पोहोचला आहे.

जानेवारी 2023 मध्ये कंपनीचा शेअर आपल्या लाईफ टाइम हाय लेव्हलवर पोहोचला होता. मात्र यानंतर, त्याला नफा वसुलीचा फटका बसला. गेल्या एका महिन्यात या मल्टीबॅगर स्टॉकच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून आली आहे.

गेल्या 6 महिन्यांचा विचार कता, कंपनीच्या शेअरचा भाव 175 रुपयांवरून 391 रुपयांवर पोहोचला. अर्थात 6 महिन्यांतच पोझिशनल गुंतवणूकदारांना 125 टक्क्यांचा परतावा मिळाला. महत्वाचे म्हणजे, गेल्या एका वर्षात या डिफेन्स स्टॉकचा भाव 50 रुपयेच होता. आजचा विचार करता यात 675 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे.

गुंतवणूकदार मालामाल - गेल्या तीन वर्षांपूर्वी ज्या गुतंवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल, त्यांची चांदी झाली आहे. तेव्हा निबेच्या एका शेअरची किंमत 12 रुपये एवढी होती. तेव्हा या पेनी स्टॉकमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आणि ती आतापर्यंत कायम ठेवली त्यांना 32.50 पट परतावा मिळाला असेल.

याच पद्धतीने गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 5500 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे. या काळात कंपनीचा शेअर 7.10 रुपयांवरून 391 रुपयांवर पोहोचला आहे. 5 वर्षांपूर्वी यात ज्यांनी 1 लाख रुपयांची गुतवणूक केली असेल आणि ती कायम ठेवली असेल, त्याचा परतावा आता 56 लाख रुपये झाला असेल.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)