'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 23:24 IST2025-11-26T23:03:29+5:302025-11-26T23:24:07+5:30
गेल्या तीन वर्षांत या शेअरने जवळपास ९००% चा बंपर रिटर्न दिला आहे आणि सध्या कंपनीचे बाजार भांडवल सुमारे ५५० कोटी रुपये आहे.

क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू आणि माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माने शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या एका स्मॉलकॅप कंपनीत गुंतवणूक केली आहे. रोहितसह युवा फलंदाज तिलक वर्मा, श्रेयस अय्यरचे वडील संतोष व्यंकटेश्वरन अय्यर आणि कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक अभिषेक मोहन नायर यांनीही या कंपनीचे शेअर खरेदी केले आहे.

या कंपनीत मोठी गुंतववणूक - रोहित शर्मासह हे चारही जण स्मॉलकॅप कंपनी स्वराज सूटिंग्स (Swaraj Suiting) च्या 'प्रेफरेंशियल इश्यू'द्वारे (Preferential Issue) समभाग मिळवणाऱ्या १९८ प्रस्तावित वाटपधारकांमध्ये सामील आहेत. कंपनीच्या नियामक फाइलिंगनुसार, या चौघांना प्रत्येकी ११०००-११००० समभाग मिळणार आहेत.

स्वराज सूटिंग्सने एकूण ४३,७६,५०० इक्विटी शेअर्स २३६ रुपये प्रति शेअर या दराने प्रेफरेंशियल बेसिसवर जारी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

असा आहे कंपनीचा प्लॅन - या इश्यूमधून कंपनी सुमारे ₹१०३.२८ कोटींचा निधी उभारण्याची योजना आखत आहे, यासाठी भागधारकांची आणि नियामक संस्थांची मंजुरी आवश्यक आहे.

कंपनी इक्विटी शेअर्ससह ६७,९७,००० परिवर्तनीय वॉरंट्स (Convertible Warrants) देखील २३६ रुपये प्रति वॉरंट दराने जारी करणार आहे, ज्याचे एकूण मूल्य सुमारे ₹१६०.४० कोटी असेल. यामुळे कंपनीचे भागभांडवल वाढेल.

कंपनीच्या आणखी एका प्रस्तावात ₹७५ कोटींपर्यंत कर्जे किंवा हमी देण्याची परवानगी आहे, विशेषतः ज्या संस्थांमध्ये संचालकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भागभांडवल असू शकते त्यांना, याव्यतिरिक्त, कंपनीने कर्ज घेण्याची मर्यादा ₹१,००० कोटींपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

शेअरची कामगिरी उत्कृष्ट: बुधवारी (एनएसई) कंपनीचे शेअर्स ७.८५% वाढून २७२.८५ रुपये प्रति शेअरवर बंद झाले. गेल्या तीन वर्षांत या शेअरने जवळपास ९००% चा बंपर रिटर्न दिला आहे आणि सध्या कंपनीचे बाजार भांडवल सुमारे ५५० कोटी रुपये आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

















