Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:12 IST2025-12-30T10:52:50+5:302025-12-30T12:12:03+5:30
Silver Price : अनेकांना सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करायची असते. पण, सगळे जण संधीची वाट पाहत असतात. दर कमी येण्यासाठी गुंतवणूकदार थांबलेले असतात.

सध्याच्या काळात गुंतवणूक एक सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. पण, ही गुंतवणूक नेमकी कशाच्या स्वरुपात करायची याची माहिती नसते. बरेच जण सोन्या-चांदीमध्ये पैसे गुंतवतात. तर दुसरीकडे, मागील दोन वर्षांपासून सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे अनेक जण याचे दर कमी येण्याची वाट पाहत आहेत.

गुंतवणूकदारांचा डोळा हा सोन्यावर असतो. सोन्यामध्ये गुंतवणूक केल्याने मोठा फायदा होतो. पण, आता चांदीने गुंतवणूकदारांना जास्त रिटर्न दिल्याचे दिसत आहे. २०२५ मध्ये संपत आला आहे. या वर्षात चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

सोन्या पेक्षा चांदीने या वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. चांदीने दोन महिन्यातच ७२ हजार रुपयांचा फायदा करुन दिला आहे.

२०२५ मध्ये चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये एक किलो चांदीची किंमत १५१,००० प्रति किलोग्राम एवढी होती. डिसेंबरमध्ये एक किलो चांदीची किंमत २३०,००० प्रति किलोग्राम पर्यंत पोहोचली आहे.

समजा गुंतवणूकदाराने जर ऑक्टोबरमध्ये एक किलो चांदी विकत घेतली असती, त्यावेळी चांदीची किंमत १५१,००० एवढी होती. तर आताच्या भावानुसार त्याला अंदाजे २३०,००० रुपये एवढी किंमत मिळाली असती. म्हणजेच ७९,००० रुपये इतका नफा झाला असता.

शुक्रवारी जीएसटीशिवाय चांदी २,२८,१०४ रुपये प्रति किलो आणि सोनं १,३७,९५६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होते. आज जीएसटीशिवाय सोने १,३८,१६१ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर उघडलं. या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ६२,४२१ रुपयांची वाढ झाली .

दरम्यान, काल म्हणजेच २९ डिसेंबर रोजी चांदीमध्ये एका तासाच्या आत मोठी घसरण पाहायला मिळाली.MCX वर मार्च महिन्याचा फ्युचर्स दर एका तासात २१,००० रुपये प्रति किलोनं कोसळून २,३३,१२० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही चांदीच्या किमतीत मोठे चढ-उतार दिसून आले. सोमवारी किमती पहिल्यांदाच ८० डॉलर प्रति औंसच्या पार गेल्या होत्या, मात्र त्यानंतर नफा वसुलीसाठी झालेली विक्री आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील शांतता चर्चेच्या बातम्यांमुळे दर ७५ डॉलरच्या खाली आले.

या घसरणीचं सर्वात मोठं कारण गुंतवणूकदारांनी केलेली नफेखोरी आणि भू-राजकीय तणावातील घट हे आहे. युक्रेन युद्धात संभाव्य शांतता कराराच्या बातम्यांमुळे 'सेफ-हेवन' (सुरक्षित गुंतवणूक) म्हणून असलेली मागणी कमी झाली. याशिवाय, वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांदीमध्ये १८१ टक्क्यांची अभूतपूर्व वाढ झाली होती, हे देखील या वेगवान नफेखोरीचे एक प्रमुख कारण ठरले.

















