गौतम अदानींना धक्का! एका वर्षात बुडाले 3.4 लाख कोटी रुपये, 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:28 IST2025-03-24T16:45:07+5:302025-03-24T17:28:57+5:30
आर्थिक वर्ष 2025 मध्ये अदानी समूहाला 21 टक्के किंवा 3.4 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

Gautam Adani Stocks : गौतम अदानींच्या नेतृत्वातील अदानी समूहासाठी आर्थिक वर्ष 2024-25 हे मोठ्या चढ-उतारांनी भरलेले होते. समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये या काळात लक्षणीय घट झाली. या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे, अमेरिकेतून करण्यात आलेले आरोप! आपण शेअर बाजाराच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, 2025 या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या शेअर्सना 21 टक्के किंवा 3.4 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला.
रिपोर्टनुसार, अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स सर्वाधिक घसरले. या वर्षी कंपनीचे बाजार भांडवलाही निम्म्यावर आले. 21 मार्च 2025 पर्यंत अदानी ग्रीन एनर्जीचे एकूण मार्केट कॅप 1.46 लाख कोटी रुपये होते, तर 28 मार्च 2024 रोजी 2.90 लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 50 टक्के तोटा झाला आहे.
समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरच्या किमतीत यावर्षी 27 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 94,096 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह ही दुसरी सर्वात मोठी घसरण आहे.
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये देखील घट झाली आहे. याच कालावधीत कंपनीचे बाजार भांडवल रु. 33,029 कोटी किंवा 11.40 टक्क्यांनी घसरले.
अदानी टोटल गॅसच्या मार्केट कॅपमध्ये 31.84 टक्क्यांची घसरण दिसून आली. यासह कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 32,411.40 कोटी रुपयांची घट झाली आहे.
अदानी एनर्जी सोल्युशन्सचे मार्केट कॅप 18.95 टक्क्यांनी घसरून 14,546.59 कोटी रुपये झाले आहे.
ACC आणि अंबुजा सिमेंट अनुक्रमे 23.10% आणि 15.92% घसरले आहेत.
अदानी विल्मर 17.35% घसरली, तर संघी इंडस्ट्रीज 36.84% घसरली.
अनुकूल प्रादेशिक परिस्थिती असूनही अदानी पॉवरच्या बाजार भांडवलात 2.11% ची किंचित घट झाली.
अदानी समूहाची मीडिया कंपनी एनडीटीव्हीच्या मूल्यांकनात 41.58 टक्क्यांनी घसरण झाली आहे.