₹2 च्या शेअरचं 'तुफान'! फक्त 4 वर्षात ₹1500 वर पोहोचला भाव, दिला 75000% चा परतावा; आता कंपनीनं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 08:44 AM2024-03-20T08:44:31+5:302024-03-20T08:51:41+5:30

या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअरने या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 75000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.

शेअर बाजारात सध्या वारी रिन्युएबल कंपनीच्या शेअर्सचे तुफान बघायला मिळत आहे. शेअर बाजारात एकिकडे मोठी घसरण सुरू असताना, दुसरीकडे या सोलर बिझनेसशी संबंधित कंपनीचा शेअर मंगळवारी 5% च्या अप्पर सर्किटसह 1551.65 रुपयांवर पोहोचला आहे.

वारी रिन्यूएबल (Waaree Renewable)चा शेअर गेल्या केवळ 4 वर्षातच 2 रुपयांवरून 1500 रुपयांपर्यंत वाधारला आहे. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअरने या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 75000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.

कंपनीचा शेअर 20 मार्च 2020 रोजी 2.06 रुपयांवर होता. तो आता 1551.65 रुपयांवर पोहोचला आहे.

वारी रिन्यूएबलने (Waaree Renewable) अपला स्टॉक स्प्लिट केला आहे. शेयर स्प्लीटची रेकॉर्ड डेट 15 मार्च 2024 होती. सोलर कंपनीने 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरची 2 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्समध्ये विभागणी केली आहे.

वारी रिन्यूएबलने आपल्या गुंतवणुदारांना एकदा बोनस शेअर्सचं गिफ्टदेखील दिलं आहे. कंपनीने जुलै 2014 मध्ये 57:100 या प्रमआणात बोनस शेअर दिले आहेत. अर्थात, वारी रिन्यूएबलने आपल्या गुंतवणूकदारांना 100 शेअर्सवर 57 शेअर्स दिले आहेत.

एका वर्षात दिला 971% परतावा - वारी रिन्युएबलच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात तब्बल 971% एवढी वाढ झाली आहे. 20 मार्च 2023 रोजी कंपनीचा शेअर 144.82 रुपयांवर होते. जो 19 मार्च 2024 रोजी 1551.65 रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या 6 महिन्यांचा विचार करता, वारी रिन्युएबलचा शेअर 531% ने वधारला आहे. गेल्या 6 महिन्यांत सोलर कंपनीचा शेअर 245.65 रुपयांवरून 1551.65 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

या वर्षाचा विचार करता, वारी रिन्युएबलचा शेअर आतापर्यंत 253% ने वधारला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1641 रुपये आहे. तर निचाक 136.02 रुपये आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)