गुंतवणूकदारांची चांदी! फक्त 3 वरून थेट 2535 रुपयांवर पोहोचला 'हा' शेअर, 1 लाखाचे केले 169 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 05:02 PM2022-08-29T17:02:04+5:302022-08-29T17:13:42+5:30

शेअर बाजारात अथवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करता पेशन्स ठेवून गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.

आपण मल्टीबॅगर स्टॉक, असे नाव अनेक वेळा ऐकले असेल. हे असे शेअर्स असतात, जे काही रुपयांच्या गुंतवणुकीचे रुपांत हजारो रूपयांत करतात. मात्र, यात गुंतवणूकदाराने दीर्घ काळ टीकून रहायला हवे. यात, आज पैसा लावला आणि उद्यापासून लगेचच परतावा मोजायला सुरुवात केली, असे होत नसते. खरे तर, शेअर बाजारात अथवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करता पेशन्स ठेवून गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.

आज आम्ही आपल्याला अशाच एका टायटन कंपनीच्या स्टॉकसंदर्भात माहिती देत आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. विशेष म्हणजे, या कंपनीने बोनस शेअरसोबतच स्टॉक स्पिलटचीही घोषणा केली आहे. भारतीय शेअर बाजाराने नजिकच्या काही वर्षांत जो मल्टीबॅगर स्टॉक उभा केला आहे, त्यांत एक नाव टायटन शेअरचेही आहे.

फक्त 3 रुपयांवरून 2535 पुरयांवर पोहोचला हा शेअर - केवळ 3 रुपयांपासून सुरू झालेला टायटनचा शेअर आज तब्बल 2535 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 20 वर्षांत या शेअरने 845 पट उसळी घेतली आहे. या शेअरमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली, त्यांनी कमाई तर केलीच, शिवाय कंपनीने 10:1 च्या हिशेबाने शेअर स्पिलट आणि 1:1 अशा बोनस शेअरचीही घोषणा केली आहे.

स्टॉक स्पिलटने शेअरहोल्डर्सना कसल्याही प्रकारचा थेट फायदा होत नाही. मात्र, शेअर्सच्या वितरणामुळे त्याची संख्या वाढते आणि इनपुट खर्च कमी होतो. ज्या लोकांनी 20 वर्षांपूर्वी टायटनचे शेअर विकत घेतले होते, त्यांच्या इनपुट कॉस्टमध्ये 10 टक्क्यांपर्यंतची खसरण दिसून आली आहे.

शेअरहोल्डर्सना जबरदस्त फायदा - टाटा ग्रुप कंपनीने जून 2011 मध्ये शेअर होल्डर्ससाठी 1:1 बोनस शेअरची घोषणा केली आहे. यानुसार, ज्या लोकांनी 20 वर्षांपूर्वी टायटनचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांचे इंपुट कॉस्ट 50 टक्यांपर्यंत आले आहे. स्टॉक स्पिलटमुळे आधीच 10 परसेंट इनपुट कॉस्ट कमी झाला होत. यानंतर, बोनस शेअरमुळे गुंतवणूकदारंची कॉस्ट प्राइस 5 टक्के आणखी कमी झाली.

अशा प्रकारे ज्या लोकांनी 3 रुपयांना एक शेअर खरेदी केला होता, त्या एका शेअरची खरी किंमत आता 0.15 रुपये झाली आहे. अशा प्रकारे या शेअरची खरेदी किंमत 3 रुपये न राहता 0.15 रुपये झाली आणि ती वाढून 2535 रुपयांवर पोहोचली. गेल्या दोन दशकांत टायटनच्या शेअरमध्ये 16,900 पटींपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वीस वर्षांपूर्वी टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये 3 रुपयांप्रमाणे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत टिकवून ठेवली असती, तर आता त्याच्या 1 लाख रुपयांचे दोन दशकांत 169 कोटी झाले असते. अर्थात त्याला 16,900 पट (₹2535/ ₹0.15) फायदा झाला असता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)