एका वर्षात पैसा डबल! TATA समूहाच्या कंपनीची कमाल, बंपर परतावा देत गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 11:34 AM2023-12-26T11:34:50+5:302023-12-26T12:00:04+5:30

महत्वाचे म्हणजे, टाटा समूहाचा हा शेअर गेल्या एका दशकापासू गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा ठरला आहे. या शेअरने कधीही निगेटिव्ह परतावा दिलेला नाही.

टाटा समूहातील एका कंपनीने या वर्षात अर्थात 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. या कंनीचे नाव आहे, ट्रेंट लिमिटेड (Trent Ltd), ट्रेड लिमिटेडच्या शेअर्समध्ये केवळ 5 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा पैसा केवळ एका वर्षातच डबल अर्थात 10 लाख रुपयांपेक्षाही अधिक झाला आहेत.

महत्वाचे म्हणजे, टाटा समूहाचा हा शेअर गेल्या एका दशकापासू गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा ठरला आहे. या शेअरने कधीही निगेटिव्ह परतावा दिलेला नाही.

कोणत्या क्षेत्रात काम करते कंपनी? - टाटा समूहाची कंपनी ट्रेंट लिमिटेड रिटेल, ब्यूटी आणि फॅशन प्रोडक्ट्सच्या उद्योगांत आहे. या कंपनीच्या मुख्य ब्रँड्समध्ये जुडिओ आणि वेस्टसाइडचा समावेश आहे. याचे संपूर्ण देशभरात 500 हून अधिक स्टोअर्स आहेत.

टाटा समूहाची ही कंपनी एक लाख कोटी रुपये मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवसायाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी Trent MCap 1.05 लाख कोटी रुपये नोंदवण्यात आला होता. तसेच कंपनीचा शेअर किंचित वाढीसह 2968 रुपयांवर बंद झाला.

असा आहे कंपनीच्या शेअरचा परफॉर्मन्स - टाटा समूहाने Trent Ltd ची स्थापना 1998 मध्ये केली. गेल्या 10 वर्षांपूर्वी 13 डिसेंबर 2013 रोजी या कंपनीच्या एका शेअरची किंमत केवळ 101 रुपये एवढी होती. जी गेल्या शुक्रवारी वाढून 29680 रुपयांवर पोहोचली.

या शेअरने गेल्या 5 वर्षांत आपल्या शेअरहोल्डर्सच्या संपत्तीत जबरदस्त वाढ करत त्यांना तब्बल 72.25 टक्क्यांपर्यंतचा बंपर परतावा दिला आहे. 28 डिसेंबर 2018 रोजी Trent चा शेअर 361.40 रुपयांवर होता.

2023 मध्ये गुंतवणूकदारांचा पैसा डबल - या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा पैसा या वर्षात अर्थाता 2023 मध्ये दुप्पट झाला आहे. या कालावधीत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 118.64 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

गेल्या 26 डिसेंबर 2022 रोजी, कंपनीच्या एका शेअरची किंमत 1357.50 रुपये होती. जी वाढून आता दुप्पटहून अधिक झाली आहे. यानुसार, कंपनीच्या शेअरने गेल्या एका वर्षात 1610.50 रुपयांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)