शेअरचा धमाका...! एकाच वर्षात दिला 60000% परतावा, ₹3 वरून ₹1700 वर पोहोचला; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:54 IST2024-12-25T16:49:18+5:302024-12-25T16:54:14+5:30
या कंपनीचा शेअर केवळच एकाच वर्षात 60,000% पेक्षाही अधिक वधारला आहे...

शेअर बाजारातील श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्कच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ एकाच वर्षात बंपर परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर केवळच एकाच वर्षात 60,000% पेक्षाही अधिक वधारला आहे.
या कालावधीत श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर 3 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वाढला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 2197.70 रुपये तर नीचांकी पातळी 2.73 रुपये आहे.
एका वर्षात 60000% हून अधिक परतावा - गेल्या एका वर्षात श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर 60777% ने वधारला आहे. हा शेअर 27 डिसेंबर 2023 रोजी 2.95 रुपयांवर होता. तो 24 डिसेंबर 2024 रोजी 1795.90 रुपयांवर बंद झाला.
गेल्या 2 वर्षांचा विचार करता, या कालावधीत कंपनीचा शेअर 73500% वधारला. दरम्यान हा शेअर 2.44 रुपयांवरून वाढून 1795 रुपयांच्या वर बंद झाला.
श्री अधिकारी ब्रदर्सच्या मार्केट कॅपनेही 4500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 5 वर्षात कंपनीचा शेअर 127268 टक्क्यांनी वधारला आहे.
या वर्षात आतापर्यंत 52000% हून अधिक तेजी - या वर्षात आतापर्यंत श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर 52876% ने वधारला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच, 1 जानेवारी 2024 रोजी कंपनीचा शेअर 3.39 रुपयांवर होता. तो 24 डिसेंबर 2024 रोजी 1795.90 रुपयांवर बंद झाला.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)