गुंतवणूकदारांवर रडायची वेळ! 1625 वरून थेट ₹164 वर आपटला हा मल्टीबॅगर शेअर, 1 लाखाचे झाले ₹10 हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 06:46 PM2023-03-27T18:46:13+5:302023-03-27T18:54:19+5:30

SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 90% पेक्षाही अधिकची घसरण दिसून आली आहे...

कधी काळी कोट्यधीश बनविणाऱ्या एका स्टॉकने आता आपल्या गुंतवणूकदारांवर रडायची वेळ आणली आहे. हा स्टॉक आहे. सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि. (Sel Manufacturing Company Ltd) या कापड कंपनीचा आहे.

SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 90% पेक्षाही अधिकची घसरण दिसून आली आहे. या काळात हा शेअर 1625 रुपयांवरून थेट 164.35 रुपयांवर आला आहे.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान - या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात गुंतवणूक करणाऱ्यां गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गेल्या एका वर्षात एक लाख रुपयांचे केवळ 10 हजार रुपयेच उरले आहेत. SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचा 52 आठवड्यांतील निचांक 168.20 रुपये आहे तर उच्चांक 1,237.85 रुपये आहे.

या कंपनीचे मार्केट कॅप 557.33 कोटी रुपये आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ही कंपनी कर्जात बुडालेली आहे आणि गेल्या वर्षांत या कंपनीचे ट्रेडिंगदेखील बरेच दिवस बंद होते.

असे होते त्रैमासिक निकाल - SEL मॅन्युफॅक्चरिंगला डिसेंबर तिमाहीत घाडा झाला होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीचा घाटा 45.20 कोटी रुपये होता. एक वर्षापूर्वी याच काळात हा घाटा 28.30 कोटी रुपये होता.

डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत विक्री 21.55% वाढून 142.57 कोटी रुपये झाली. तसेच एक वर्ष आधी डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाही दरम्यान ही 117.29 कोटी रुपये होती. डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये EBITDA निगेटिव्हमध्ये 10.49 कोटी रुपेय होता. तसेच डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 6.04 कोटी रुपये होता.