Rakesh Jhunjhunwala यांच्या पावरफूल शेअर्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; स्वस्तात खरेदी करा अन् व्हा कोट्यधीश!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 09:27 PM2021-10-30T21:27:24+5:302021-10-30T21:37:34+5:30

या वर्षी आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीने 22 आणि 24 टक्के परतावा दिला आहे, बिग बुलच्या पोर्टफोलिओतील हे शेअर्स एकतर घसरले आहेत किंवा फ्लॅट ट्रेंड करत आहेत. पण...

भारतीय शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) एक असे दिग्गज गुंतवणूकदार आहेत, की ज्यांच्या पोर्टफोलियोवर सर्वच गुंतवणूक दारांचे लक्ष असते. शेअर मार्केटमधील दिग्गजांनी कोणते शेअर्स विकत घेतले आणि कोणते विकले, यावर नेहमीच गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात. (Rakesh Jhunjhunwala Share)

या वर्षी आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीने 22 आणि 24 टक्के परतावा दिला आहे, बिग बुलच्या पोर्टफोलिओतील हे शेअर्स एकतर घसरले आहेत किंवा फ्लॅट ट्रेंड करत आहेत. पण, यातील काही शेअर्स असेही आहेत, ज्यांसंदर्भात ब्रोकरेज हाऊसने मोठ्या रिटर्नची आशा वर्तवली आहे. आपणही पैसे गुंतवून या तेजीचा फायदा घेऊ शकता. या शेअर्सवर डिस्काउंटदेखील उपलब्ध आहे. म्हणजेच, तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगली कमाई करू शकता.

Jubilant Pharmova - Jubilant Pharmova मध्ये यावर्षी सुमारे 33% घट दिसून आली. या वर्षी सुमारे 290 रुपयांनी कमकुवत होऊन हा शेअर 600 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टचे दीर्घकालीन लक्ष्य 850 रुपये आहे. तर हाऊस मोतीलालने 960 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. राकेश झुनझुनवाला यांचा या कंपनीत 6.3 टक्के वाटा आहे.

Multi Commodity Exchange of India - Multi Commodity Exchange of India मध्ये या वर्षी सुमारे 9% घट दिसून आली. यावर्षी हा स्टॉक सुमारे 160 रुपयांनी कमकुवत होऊन सध्या 1590 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने यामध्ये 1890 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. या कंपनीत राकेश झुनझुनवाला यांची 4.9 टक्के भागीदारी आहे.

Rallis India - Rallis India ने यावर्षी फ्लॅट रिटर्न दिले. म्हणजेच या शेअर्समध्ये कोणतीही वाढ किंवा घट झाली नाही. बाजाराच्या या तेजीमध्ये हा शेअर 284 रुपयांच्या डिस्काउंटने मिळत आहे. आयसीआयसीआय डायरेक्टने या शेअरमध्ये ३६५ रुपयांचे टार्गेट दिले आहे. या कंपनीत बिग बुलची 9.9 टक्के भागीदारी आहे.

Lupin - Lupin Limited मध्ये या वर्षी 8% ची घसरण दिसून आली. या वर्षी हा शेअर सुमारे 80 रुपयांनी कमकुवत होऊन 920 रुपयांवर व्यवहार करत आहे. ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने यात 1300 रुपये, तर शेअरखानने 1400 रुपयांचे टार्गेट दिले आहे. राकेश झुनझुनवाला यांचा या कंपनीत 1.6 टक्के वाटा आहे.

Wockhardt - Wockhardt मध्ये यावर्षी 22% घसरण दिसून आली. हा शेअर या वर्षी 118 रुपयांनी कमकुवत होऊन 425 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. राकेश झुनझुनवाला यांचा या कंपनीत २.३ टक्के वाटा आहे. याच बरोबर, यावर्षी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्समध्ये 6 टक्क्यांची घसरण दिसत आहे.

शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला. (टीप - शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखिमेवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणेही आवश्यक आहे.)