याला म्हणतात धमाका...! 8 रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या या स्टॉकनं बनवलं करोडपती; झाली छप्परफाड कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 12:50 PM2022-12-11T12:50:30+5:302022-12-11T13:02:14+5:30

गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी बघायला मिळाली आहे. यामुळेच या शेअरमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केलेले लोक श्रीमंत झाले आहेत.

शेअर बाजारातील काही गुंतवणूकदार दीर्घ मुदतीत जबरदस्त नफा कमावताना दिसतात. काहीसे असेच चित्र रॅडिको खेतानच्या (Radico Khaitan) शेअरधारकांमध्ये दिसून आले. गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी बघायला मिळाली आहे. यामुळेच या शेअरमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केलेले लोक श्रीमंत झाले आहेत. रॅडिको खेतानच्या शेअरची किंमत गेल्या दोन दशकांत 14,100 टक्क्यांनी वाढली आहे.

असा आहे कंपनीच्या शेअरचा इतिहास - गेल्या एक महिन्याच्या काळात कंपनीच्या शेअर्सचा भाव 1000 रुपयांनी वाढून 1087 रुपयांच्याही पुढे गेला आहे. अर्थात गेल्या एका महिन्यात Radico Khaitan चा शेअर 8.7 टक्क्यांनी वधारला आहे. या शेरमध्ये 6 महिन्यांपूर्वी ज्याने कुणी गुंतवणूक केली असेल, त्याला आतापर्यंत 37 टक्क्यांचा फायदा झाला असेल. 2022 संदर्भात बोलायचे झाल्यास Radico Khaitan च्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. म्हणजेच, या वर्षी सुरुवातीच्या घसरणीनंतर, या शेअरच्या किमतीत तेजी दिसून आली आहे.

या शेअरच्या गेल्या 5 वर्षांतील कामगिरीवर नजर टाकली असता, या शेअर्सने 300 टक्क्यांनी अधिकचा परतावा दिला आहे. या काळात, रॅडिको खेतानच्या समभागाची किंमत 270 रुपयांवरून 1087 रुपयांवर पोहोचली.

याच बरोबर गेल्या 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या स्टॉकची क्षमता ओळखून डाव लावणाऱ्या गुंतवणूकदारांना 650 टक्के एवढा तगडा परतावा मिळाला आहे. दहा वर्षांपूर्वी कंपनीच्या एका शेअरची किंमत केवळ 7.62 रुपये एवढी होती. या शेअरमध्ये तेव्हा गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आता कोट्यधीश झाले असणार.

हे गुंतवणूकदार झाले कोट्यधीश - Radico Khaitan च्या स्टॉकमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 1 महिन्यापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, त्याचा परतावा वाढून आता 1.08 लाख रुपये झाला आहे. तर, 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूककरणाऱ्यांना 1.37 लाख रुपयांचा परतावा मिळाला असेल.

याच प्रमाणे, 10 वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुतवणूकदारांना आता 7.5 लाख रुपयांचा परतावा मिळाला असेल. याच पद्धतीने 20 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर जेव्हा 7.65 रुपयांवर होता तेव्हा ज्या गुंतवणूकदारांनी यात 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, त्याचा परतावा आता 1.42 कोटी रुपये झाला असेल.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)