शेअर असावा तर असा! 33 पैशांवरून ₹7 वर गेला, 3 वर्षांत 2000% परतावा दिला; आता कंपनीची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 06:00 PM2023-11-27T18:00:32+5:302023-11-27T18:05:27+5:30

गेल्या केवळ तीन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 2000 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे.

शेअर बाजारातील Integra Essentia या छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 3 वर्षांत जबरदस्त तेजी आली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 33 पैशांवरून 7 रुपयांवर पोहोचला आहे.

महत्वाचे म्हणजे गेल्या केवळ तीन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 2000 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. यातच आता या स्मॉलकॅप कंपनीने सोमवारी मोठी घोषणा केली आहे. इंटेग्रा इसेंशियाने (Integra Essentia) आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे.

प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर देण्याची घोषणा - आपल्या संचालक मंडळाने 27 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत 1:1 या प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली असल्याची माहिती इंटेग्रा इसेंशियाने स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. अर्थात, कंपनी प्रत्येक शेअरसाठी 1 बोनस शेअर देईल. कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. कंपनीच्या संचालक मंडळाने 100 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यासही मान्यता दिली आहे.

3 वर्षांत 2027 टक्क्यांचा परतावा - इंटेग्रा इसेंशियाचा शेअर 27 नोव्हेंबर 2020 रोजी 33 पैशांवर होता. तो 24 नोव्हेंबर 2023 रोजी 7.02 रुपयांवर बंद झाला. या कंपनीच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2027 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

3 वर्षांतच 1 लाख रुपयांचे झाले 21 लाख रुपये - जर एखाद्या व्यक्तीने 27 नोव्हेंबर 2020 रोजी इंटेग्रा इसेंशियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर तर आता त्याचे मूल्य 21.27 लाख रुपये झाले असते.

इंटेग्रा इसेंशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये 3 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सना 1 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्समध्ये विभाजन केले आहे. आम्ही आमच्या कॅलक्युलेशनमध्ये स्टॉक स्प्लिट समावेश केलेला नाही.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)